रावेर प्रतिनिधी : रावेर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघच्या चेअरमन पदी नितीन प्रकाश पाटील तर व्हाईस चेअरमन पुरुषोत्तम तुकाराम पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली त्यांच्या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
याबाबत अधिक असे की, माजी चेअरमन व्हाईस चेअरमन दोघांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. झालेल्या रिक्त जागेवर आज खरेदी विक्री संघाची आज विशेषसभा आयोजन केली होती. यामध्ये चेअरमन पदासाठी नितीन पाटील तर व्हाईस चेअरमन पदासाठी पुरुषोत्तम पाटील दोघांचा एकमेव अर्ज आल्याने दोघांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.
सभेत माजी आमदार अरुण पाटील यांनी मनोगत व्यक्त केल यावेळी बाजार समिती सभापती प्रल्हाद पाटील, उप सभापती पंकज पाटील,बाजार समिती संचालक मंदार पाटील, डॉ राजेंद्र पाटील, नगर सेवक राजेंद्र चौधरी, शिवसेना शिंदे गट वाय व्ही पाटील, सोपान पाटील यांची विशेष उपस्थितीती होती. यावेळी संचालक निलेश चौधरी, यशवंत महाजन, किशोर पाटील, रमेश पाटील, जिजबराव चौधरी, सिताराम महाजन, लक्ष्मण मोपारी, सुरेश पाटील, पुरुषोत्तम पाटील, निळकंठ चौधरी, ज्ञानेश्वर धनगर, बिसन सपकाळ, तुषार मानकर,वासुदेव पाटील, नयना पाटील, उर्मिलाबाई पाटील,पी.आर.पाटील, प्रशांत पाटील उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचलन मॅनेजन विनोद चौधरी यांनी केले.



