Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»समाजसेवेचा नवा अध्याय : साक्षात वानर हनुमान वाचनालय उद्घाटन व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा !

जळगाव

समाजसेवेचा नवा अध्याय : साक्षात वानर हनुमान वाचनालय उद्घाटन व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा !

Editorial DeskBy Editorial DeskJune 7, 2026Updated:June 7, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जामनेर, प्रतिनिधी  | शिवराज्याभिषेक दिनाचे  औचित्य साधून साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठान, जामनेर यांच्या वतीने संत गजानन महाराज मंदिर, शास्त्रीनगर, जामनेर येथे साक्षात वानर हनुमान वाचनालय उद्घाटन, रुग्णवाहिका लोकार्पण व दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प.पू. शामचैतन्य बापू, अध्यक्षस्थानी ह.भ.प. एकनाथ महाराज चवरे, प्रमुख वक्ते म्हणून श्री. निलेश चव्हाण सर उपस्थित होते. तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री. गजानन मंडवे सर, नगरसेवक श्री. बाबुराव हिवराळे, ब्रह्मकुमारी आश्रमच्या सुषमा दीदी व प्रतिष्ठानचे सदस्य श्री. विनोद भोई यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साक्षात वानर हनुमान वाचनालयाचे उद्घाटन व रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रमुख वक्ते निलेश चव्हाण सर यांनी आपल्या भाषणात इतिहास हा ताठ मानेने जगणाऱ्यांचा लिहिला जातो व त्याचे सर्वोत्तम उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज असल्याचे सांगितले. आज साडेतीनशे वर्षांनंतरही शिवरायांच्या इतिहासाची साक्षीदार होण्याची संधी समाजाला मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

प.पू. शामचैतन्य बापू यांनी व्यसनमुक्ती, शिक्षण व संस्कार याविषयी मार्गदर्शन करत तरुणांनी शिक्षण क्षेत्रात पुढे जावे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आत्मसात करण्याचे आवाहन केले.
श्री. गजानन मंडवे सर यांनी साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठानच्या या अभिनव सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत शिक्षण, आरोग्य व समाजसेवा यांचा संगम घडवून आणल्याबद्दल प्रतिष्ठानला शुभेच्छा दिल्या.

यावेळी वाचनालयासाठी विविध मान्यवर व दात्यांकडून मदतीची घोषणाही करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज वाचनालय, तोंडापूर यांच्या वतीने ११ हजार रुपयांची रोख देणगी प्रदान करण्यात आली. तसेच नगरसेवक श्री. बाबुराव हिवराळे यांनीही ११ हजार रुपयांची देणगी जाहीर करून प्रदान केली. याशिवाय काही दात्यांनी वाचनालयासाठी वर्षभर लागणारे वर्तमानपत्र उपलब्ध करून देण्याची घोषणा केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक माळी सर यांनी केले. नाना सातवे यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची माहिती दिली. तर  जितू कुमावत यांनी आभार प्रदर्शन केले.

संपूर्ण अभियानाचा उद्देश, लेखाजोखा, खर्चाचा तपशील तसेच आगामी उपक्रमांची माहिती श्री. राहुल चव्हाण यांनी उपस्थितांसमोर मांडली.
कार्यक्रमास जगदीश बैरागी, संतोष सोनवणे, दीपक पवार, ईश्वर चवरे, प्रशांत भोई, जयवंत पर्वते, सोपान लोहार, भोला निकम, डॉ. पंकज माळी, अमोल इंगळे, अक्षय पवार, रामेश्वर पाटील, ईश्वर चौधरी, शंकर सातवे, भरत ठाकरे, विजय शिवदे व सुदर्शन वराडे यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी रुग्णवाहिका सेवा व आरोग्यविषयक उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल रेड स्वस्तिक सोसायटीचे आयोजकांतर्फे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून शिक्षण, आरोग्य व सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add