Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»हनुमान व्यायाम शाळेच्या प्रणय बावस्करचे ऐतिहासिक यश; वरणगावात ढोल-ताशांच्या गजरात जंगी मिरवणूक

जळगाव

हनुमान व्यायाम शाळेच्या प्रणय बावस्करचे ऐतिहासिक यश; वरणगावात ढोल-ताशांच्या गजरात जंगी मिरवणूक

Editorial DeskBy Editorial DeskJune 6, 2026Updated:June 6, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​वरणगाव प्रतिनिधी | आसाममधील गुवाहाटी येथे नुकत्याच पार पडलेल्या १९ व्या राष्ट्रीय ग्रॅपलींग चॅम्पीयनशिप २०२६ स्पर्धेत वरणगावच्या क्रीडा क्षेत्रात एक ऐतिहासिक नोंद झाली आहे. येथील प्रसिद्ध श्री हनुमान व्यायाम शाळेचा खेळाडू प्रणय संजय बावस्कर याने ६६ किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला आणि वरणगावसाठी पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर ब्राँझ पदक मिळवून दिले.

​ही स्पर्धा २९ मे ते ३१ मे दरम्यान गुवाहाटी येथील दिसपूरमधील भुगेश्वरी फुकोनानी इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आली होती. मल्लयुद्धासारख्या असलेल्या या ‘नो-गी व गी’ प्रकारातील ग्रॅपलिंग स्पर्धेत भारतातील २४ राज्यांतील एकूण ५६७ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. नाशिक विभागाचे संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक दुष्यंतराजे देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा संघ २६ मे रोजी रवाना झाला होता, ज्यामध्ये जळगाव जिल्ह्यातून प्रणयने प्रतिनिधित्व केले. या चुरशीच्या स्पर्धेत अरुणाचल प्रदेशच्या मार्टिन रोमिंगने सुवर्ण, तर केरळच्या आदित्य केशवने रौप्य पदक मिळवले, तर प्रणयने महाराष्ट्राचे नाव उंचावत कांस्य पदकावर नाव कोरले.

​प्रणयचे यश वरणगावच्या इतिहासात अभूतपूर्व ठरल्याने, त्याचे आगमन झाल्यावर रेल्वे स्टेशन परिसर ते हनुमान व्यायाम शाळेपर्यंत ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. प्रणयला या खेळाचे प्रशिक्षण वस्ताद नामदेव मोरे, टीम कोच संजय बावस्कर आणि दिलीप संगेले यांचे लाभले.

​या ऐतिहासिक यशाबद्दल चंद्रकांत बढे सर, हनुमान व्यायाम शाळेचे अध्यक्ष सुनील काळे, बाळासाहेब चव्हाण, प्रा. भागवत निकम, संजय तायडे, महेंद्र इंगळे, किरण साळवे, तसेच चाळीसगाव व तालुक्यातील सर्व कमिटी सदस्यांनी प्रणयचा जाहीर सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add