Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»मविआचे उमेदवार शरद तायडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार : जयंत पाटील

जळगाव

मविआचे उमेदवार शरद तायडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार : जयंत पाटील

Editorial DeskBy Editorial DeskJune 7, 2026Updated:June 7, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​जळगाव प्रतिनिधी | विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील ६ जून रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते.

या दौऱ्यादरम्यान महाविकास आघाडीचे विधानपरिषदेचे अधिकृत उमेदवार शरद तायडे यांनी जयंत पाटील यांची भेट घेतली. या भेटीत आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या रणनीती संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली.

​यावेळी उमेदवाराला आश्वस्त करताना जयंत पाटील म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष हा महाविकास आघाडीचा एक प्रमुख आणि महत्त्वाचा घटक पक्ष आहे. आघाडीचा धर्म पाळत पक्ष पूर्ण ताकदीने विधान परिषदेचे उमेदवार शरद तायडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील.” तसेच शरद तायडे यांच्या विजयासाठी जळगाव जिल्ह्यातील पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते पूर्ण क्षमतेने काम करतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

​या महत्त्वपूर्ण बैठकीला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, माजी आमदार शिरीष चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील, पक्षाचे निरीक्षक भास्करराव काळे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख भूषण पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी, दिलीप खोडपे सर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महानगर प्रमुख अशोक लाडवंजारी आणि प्रसिद्ध उद्योजक श्रीराम पाटील आदी मान्यवरांचा समावेश होता. या बैठकीमुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत असून, निवडणुकीतील विजयासाठी आघाडीने जळगावात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचे स्पष्ट होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add