Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»मंदिरात चोरी करणारा अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात: घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद!

क्राईम

मंदिरात चोरी करणारा अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात: घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद!

Editorial DeskBy Editorial DeskJune 9, 2026Updated:June 9, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​चाळीसगाव प्रतिनिधी | चाळीसगाव शहरातील दोन वेगवेगळ्या मंदिरांमध्ये झालेल्या चोरीच्या घटनांचा चाळीसगाव शहर पोलिसांनी अत्यंत शिताफीने यशस्वी उलगडा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चोरीला गेलेला एकूण ५६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, पहिली घटना २६ ते २७ मे दरम्यान जयशंकर नगर परिसरात घडली होती, जिथे मंदिरातील दानपेटीतून सुमारे १५ हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली होती. यानंतर अवघ्या काही दिवसांत, म्हणजेच ४ जून रोजी दत्तवाडी परिसरातील दत्त मंदिरात चोरी झाली. चोरट्याने मंदिरातून चांदीचा मुकुट आणि चांदीचा त्रिशूळ असा अंदाजे ४४ हजार ४०० रुपये किमतीचा ऐवज लंपास केला होता. या दोन्ही घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली होती आणि चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते.

​या गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी तात्काळ आपली गोपनीय यंत्रणा आणि बातमीदार सक्रिय केले. तपास दरम्यान ८ जून रोजी मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. तांत्रिक विश्लेषण आणि सखोल चौकशी अंती या मुलाने दोन्ही मंदिरांतील चोऱ्यांची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ७ हजार १०० रुपये रोख, तसेच चोरीला गेलेला चांदीचा मुकुट व त्रिशूळ जप्त केला आहे.

​सदरची उल्लेखनीय कामगिरी जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी अमितकुमार मनेळ, प्रशांत पाटील, योगेश मांडोळे, मोहन सूर्यवंशी, पवन पाटील, विलास पवार व दिलीप राक्षे यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या या तत्पर कारवाईबद्दल नागरिकांमधून कौतुक होत आहे. 

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add