Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या ४ अट्टल गुन्हेगारांना अटक: जळगाव तालुका पोलिसांची कारवाई!

क्राईम

चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या ४ अट्टल गुन्हेगारांना अटक: जळगाव तालुका पोलिसांची कारवाई!

Editorial DeskBy Editorial DeskJune 11, 2026Updated:June 11, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | चाकूचा धाक दाखवून एका व्यक्तीस लुटणाऱ्या चार अट्टल गुन्हेगारांना जळगाव तालुका पोलिसांनी अवघ्या दोन तासांच्या आत अटक करत गुन्ह्याची यशस्वी उकल केली आहे. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या तत्परतेची चर्चा सुरू झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जून रोजी पहाटे चेतन प्रकाश पाटील हे आपल्या मित्रांसमवेत जळगाव ते पाळधी मार्गाने जात असताना नॅशनल हाय गार्डन व हॉटेल राधिका परिसरात चार जणांनी त्यांना अडवले. चौघांनी चाकूचा धाक दाखवत शिवीगाळ केली तसेच जबरदस्तीने रोख रक्कम हिसकावून घेतली. घटनेनंतर चेतन पाटील यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी डीबी पथकाला तातडीने तपासाच्या सूचना दिल्या. पथकाने तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदार आणि स्थानिक माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवत अवघ्या दोन तासांत चारही संशयित आरोपींना अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये चेतन उर्फ बट्या रमेश मुशीर, उमाकांत दत्तात्रय जाधव, गौरव संजय जाधव आणि रोशन भगवान पाटील यांचा समावेश आहे. यापैकी काही आरोपींवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शामकुमार मोरे करीत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add