Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»मुक्ताईनगरात खळबळ! बंदुकीचा धाक दाखवून भंगार व्यावसायिकाला लुटले; विवस्त्र करून व्हिडिओ बनवला

क्राईम

मुक्ताईनगरात खळबळ! बंदुकीचा धाक दाखवून भंगार व्यावसायिकाला लुटले; विवस्त्र करून व्हिडिओ बनवला

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraJune 19, 2026Updated:June 19, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​मुक्ताईनगर प्रतिनिधी  | ॲल्युमिनियम स्क्रॅप देण्याच्या बहाण्याने बोलावून एका भंगार व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा शिवारात घडली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात २० ते २५ जणांच्या टोळीविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील रहिवासी आणि भंगार व्यावसायिक अन्सारी हे त्यांचे मित्र आणि मुलासह ८ जून २०२६ रोजी सकाळी मुक्ताईनगरमधील हलखेडा गावी आले होते. आरोपी शिवा नावाच्या इसमाने त्यांना भंगार देण्याचे आमिष दाखवून येथे बोलावले होते. मात्र, ते घटनास्थळी पोहोचताच आरोपी शिवा आणि त्याच्या इतर १५ ते २० साथीदारांनी फिर्यादी व त्यांच्या सोबत्यांना घेरले.

शिवा आणि त्याच्या साथीदारांनी अन्सारी यांना बंदुकीचा धाक दाखवून जबर मारहाण केली. त्यांच्याकडील २ लाख ५५ हजार ५०० रुपये रोख, बँक खात्यातून ऑनलाईन ट्रान्सफर केलेले पैसे, मोबाईल फोन, मनगटी घड्याळ आणि चांदीची अंगठी असा एकूण ४ लाख १ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून घेतला. एवढ्यावरच न थांबता, दरोडेखोरांनी फिर्यादी व त्यांच्या साथीदारांना विवस्त्र करून त्यांचा व्हिडिओ तयार केला आणि पोलिसात गेल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन हुसकावून लावले.

​या भयानक प्रसंगानंतर पीडितांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुक्ताईनगर पोलिसांनी या प्रकरणी  दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि पोलीस निरीक्षक आशिष आडुसूंळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जयेश पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सर्व आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मोठी बातमी : पोलिसांची ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ मोहीम; मुक्ताईनगरातील तीन गावांवर पहाटे धाड, कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026

पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर संतप्त नागरिकांचा एल्गार

June 19, 2026

जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात; सात केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त

June 18, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add