Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»रावेरचे नवे पोलीस निरीक्षक संदीप पाटील ॲक्शन मोडमध्ये; अवैध धंदेवाल्यांना थेट इशारा!

क्राईम

रावेरचे नवे पोलीस निरीक्षक संदीप पाटील ॲक्शन मोडमध्ये; अवैध धंदेवाल्यांना थेट इशारा!

Editorial DeskBy Editorial DeskJune 16, 2026Updated:June 16, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​रावेर प्रतिनिधी | रावेर शहर आणि परिसरातील सामाजिक सलोखा व एकोपा अबाधित राखण्यासोबतच गुंडगिरी करणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कारवाई करणे आणि पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व अवैध धंदे समूळ नष्ट करणे, याला आपले प्रथम प्राधान्य राहील, अशी ग्वाही नवनियुक्त पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे. जळगाव येथील आर्थिक गुन्हे शाखेतून बदली झाल्यानंतर त्यांनी नुकताच रावेर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला.

​पदभार स्वीकारताच संदीप पाटील यांनी आपल्या आक्रमक भूमिकेचे स्पष्ट संकेत दिले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. मूळचे धुळे जिल्ह्यातील असलेले संदीप पाटील यांना पोलीस दलातील कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी गडचिरोली, नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), नंदुरबार, जळगाव एलसीबी आणि पिंपळगाव बसवंत अशा विविध संवेदनशील व महत्त्वपूर्ण विभागांमध्ये आपल्या कर्तव्याचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या याच कर्तव्यदक्षतेच्या पार्श्वभूमीवर आता त्यांच्याकडे रावेर सारख्या संवेदनशील पोलीस ठाण्याची धुरा सोपवण्यात आली आहे.

​नव्या पोलीस निरीक्षकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे परिसरातील गुन्हेगारी वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. बेकायदेशीर कृत्ये आणि अवैध व्यवसाय कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत, असा सज्जड दम त्यांनी दिला आहे.

​सध्या संपूर्ण रावेर शहरात पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्याच नावाची आणि कार्यपद्धतीची चर्चा रंगली आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांत रावेर शहरात झालेल्या मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास अद्याप प्रलंबित आहे. या गुन्ह्यांची उकल करून चोरट्यांचा छडा लावण्याचे मोठे आव्हान नव्या पोलीस प्रमुखांसमोर असणार आहे. मात्र, पाटील यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा होऊन शहरातील गुन्हेगारीला लगाम बसेल आणि नागरिक सुरक्षित राहतील, असा विश्वास रावेरकरांमधून व्यक्त होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add