अमळनेर प्रतिनिधी | अमळनेर येथील श्री मंगळग्रह सेवा संस्था गुलाबरावजी पाटील सोशल फाऊंडेशन (पाळधी), संकल्प सेवा फाऊंडेशन (धनवाडी) आणि आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल (पनवेल) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २१ जून रोजी भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील गरजू आणि ज्येष्ठ नागरिकांना दर्जेदार नेत्र आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.. या शिबिरामध्ये एकूण ७३ नागरिकांनी आपली नेत्रतपासणी करून घेतली. प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. विजय बामणे, डॉ. गुरुप्रीत सिंग, डॉ. राहुल पाटील, डॉ. भूपेंद्र वाघ यांच्यासह निशा शिंदे व प्राची गायकवाड यांच्या वैद्यकीय पथकाने रुग्णांची सखोल तपासणी केली. तपासणीअंती ३९ रुग्ण…
Author: Editorial Desk
चाळीसगाव प्रतिनिधी | चाळीसगाव शहरातील स्टेशन रोडवरील अष्टभुजा कॉम्प्लेक्समधील अंबिका स्वीट या दुकानात उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड होत असल्याची भावना व्यक्त होत असून, संबंधित प्रकाराची चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याची मागणी अन्न व औषध प्रशासनाकडे करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दुकानात सध्या दुरुस्तीचे काम सुरू असून, त्याचवेळी खाद्यपदार्थांची निर्मिती व विक्री सुरू असल्याचे सांगितले जात आहे. दुरुस्तीदरम्यान फर्निचर व प्लायवूड कापण्याचे काम सुरू असल्याने धूळ, भुसा आणि इतर सूक्ष्म कण खाद्यपदार्थांवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत हे पदार्थ ग्राहकांनी सेवन केल्यास पोटाचे विकार, श्वसनाचे त्रास तसेच…
अमळनेर प्रतिनिधी | दरवर्षीप्रमाणे यंदाही आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून येथील प्रसिद्ध मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर परिसरात रविवार, २१ जून रोजी सकाळी ७ ते १० या वेळेत विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळच्या प्रसन्न आणि पवित्र वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमात मंगळग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त मंडळ, मंगल सेवेकरी तसेच मंदिराच्या सेवेकऱ्यांनी मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या शिबिरामुळे उपस्थितांमध्ये आरोग्याबाबत मोठी जनजागृती झाली. शिबिराची सुरुवात सामूहिक योग प्रार्थनेने झाली. त्यानंतर योग मार्गदर्शक तथा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम आणि खजिनदार गिरीश कुलकर्णी यांनी उपस्थित सर्वांना विविध योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा आणि श्वसनक्रियांचे अचूक प्रात्यक्षिक करून दाखविले.…
जळगाव प्रतिनिधी | गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेल्या परीक्षेची फेरपरीक्षा रविवारी देशभरासह जळगाव जिल्ह्यात शांततेत आणि कडेकोट बंदोबस्तात सुरू झाली. जिल्ह्यातील १२ परीक्षा केंद्रांवर एकूण ४ हजार ७१६ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. परीक्षेची प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. यापूर्वी झालेल्या परीक्षेत गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागत असल्याने त्यांच्यासह पालकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र, फेरपरीक्षा कोणत्याही अडथळ्याविना पार पडावी यासाठी प्रशासनाने सर्व आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दुपारी १.३० वाजेपर्यंतच परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला असून…
रावेर प्रतिनिधी | नव्याने रुजू झालेले पोलिस निरिक्षक संदीप पाटील यांनी भाजपा नगरसेवक दिलीप पाटील यांच्या घोफोडीतील आरोपी पडले आहे. प्रलंबित गुन्ह्याच्या आरोपींचा शोध लावुन पर्दापाश केल्याने संदीप पाटील यांच्या कार्याची कौतुक होत आहे. शहरातील रामबाग परिसरात नगरसेवकांच्या घरी झालेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत रावेर गुन्हे शोध पथकाने चार सराईत चोरट्यांना मध्यप्रदेशातील नारायणगड येथून अटक केली आहे. आरोपींकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याचा गुन्हा उघडकीस आला असून या कारवाईमुळे पोलिसांच्या तपास कौशल्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. २० मार्च रोजी रावेर पोलिस स्थानकात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी नगरसेवक दिलीप पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १८ मार्च रोजी ते…
यावल प्रतिनिधी | यावल तालुक्यातील कोळन्हावी परिसरात घडलेल्या एका संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा छडा लावत यावल पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत खुनाचा उलगडा करून तीन आरोपींना अटक केली आहे. सुरुवातीला हा प्रकार रस्ते अपघात असल्याचे भासविण्यात आले होते. मात्र पोलिसांनी केलेल्या बारकाईच्या तपासातून हा अपघात नसून नियोजित खून असल्याचे समोर आले. या बाबत अधिक माहिती अशी की, 18 जून रोजी पहाटे पवन रवींद्र सोळंके (वय 26, रा. कोळन्हावी) याचा मृतदेह रस्त्यावर आढळला होता. मृताच्या मित्रांनी ट्रकच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. त्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र घटनास्थळी अपेक्षित प्रमाणात रक्त न सापडणे आणि इतर काही बाबी संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी…
भुसावळ (प्रतिनिधी) | “योग: कर्मसु कौशलम्” हा संदेश डोळ्यांसमोर ठेवून २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिनानिमित्त जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या भुसावळ उपविभागातर्फे विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जळगावच्या माननीय पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ येथील शहर वाहतूक शाखा येथे सकाळी ६ ते ८ या वेळेत हे शिबिर अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. या विशेष प्रसंगी भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, पोलीस निरीक्षक महेश गायकवाड आणि पोलीस निरीक्षक राहुल वाघ प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते या शिबिराची अधिकृत सुरुवात करण्यात आली. ‘महाराष्ट्र राज्य योग शिक्षक संघ, भुसावळ’ यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात नामांकित योग प्रशिक्षक श्री.…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव-भुसावळ बायपास रोडवर ट्रक चालकाला अडवून, चाकूने वार करत जबरी लूटमार करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगार टोळीचा जळगाव तालुका पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३ मुख्य आरोपींना अटक केली असून एका विधीसंघर्षित बालकाला (नाबालिग) ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २० जून २०२६ रोजी रात्री १:०० वाजेच्या सुमारास फिर्यादी ट्रक चालक मुकेश रामराव राठोड हे पाळधी जवळून जात असताना, चारचाकी व दुचाकीवरून आलेल्या ४ अज्ञात आरोपींनी त्यांचा ट्रक अडवला. आरोपींनी ट्रकवर दगडफेक करत फिर्यादी आणि क्लिनरला बेदम मारहाण केली. एका आरोपीने फिर्यादीच्या उजव्या हातावर चाकूने तीन वेळा वार करून गंभीर दुखापत केली. एवढेच…
जामनेर प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील सुप्रीम कॉलनी गाडेगाव जवळ एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात असलेल्या एका ३१ वर्षीय तरुणाच्या दुचाकीला एका अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेमध्ये दुचाकीस्वार तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे. ही घटना १४ जून रोजी दुपारी घडली असून, या संदर्भात १९ जून रोजी रात्री उशिरा जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सागर रूपचंद ब्राह्मणे (वय ३१, राहणार केकत निंभोरा, तालुका जामनेर) असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. सागर हा १४ जून रोजी दुपारी १…
जळगाव-प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कानळदा गावात जुन्या वादातून एका दांपत्याला बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना १८ जून रोजी घडली. या प्रकरणी सहा जणांविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांचन आकाश सपकाळे (वय २४, रा. कानळदा, ता. जळगाव) या आपल्या पती आकाश सपकाळे यांच्यासह गावात वास्तव्यास आहेत. यापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून गावातील मंगला धनराज सपकाळे, समाधान धनराज सपकाळे, भैय्या धनराज सपकाळे, मयूर ज्ञानेश्वर सपकाळे, दीपक बन्सी सपकाळे आणि सुरेखा मयूर सपकाळे यांनी दांपत्याला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी आरोपींनी हातातील काठीने आकाश सपकाळे यांच्या डोक्यावर वार केल्याने त्यांना…

