Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»चाकूचा धाक दाखवून ट्रक चालकाला लुटणारी टोळी जेरबंद; तालुका पोलीसांची कारवाई !

जळगाव

चाकूचा धाक दाखवून ट्रक चालकाला लुटणारी टोळी जेरबंद; तालुका पोलीसांची कारवाई !

Editorial DeskBy Editorial DeskJune 20, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी । जळगाव-भुसावळ बायपास रोडवर ट्रक चालकाला अडवून, चाकूने वार करत जबरी लूटमार करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगार टोळीचा जळगाव तालुका पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३ मुख्य आरोपींना अटक केली असून एका विधीसंघर्षित बालकाला (नाबालिग) ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २० जून २०२६ रोजी रात्री १:०० वाजेच्या सुमारास फिर्यादी ट्रक चालक मुकेश रामराव राठोड हे पाळधी जवळून जात असताना, चारचाकी व दुचाकीवरून आलेल्या ४ अज्ञात आरोपींनी त्यांचा ट्रक अडवला. आरोपींनी ट्रकवर दगडफेक करत फिर्यादी आणि क्लिनरला बेदम मारहाण केली. एका आरोपीने फिर्यादीच्या उजव्या हातावर चाकूने तीन वेळा वार करून गंभीर दुखापत केली. एवढेच नव्हे तर, आरोपींनी फिर्यादीच्या खिशातील ५,५०० रुपये रोख आणि मोबाईलमधील फोन पे (PhonePe) स्कॅनरद्वारे ऑनलाइन १,९८४ रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करून घेतले व घटनास्थळावरून फरार झाले. जखमी चालकावर सध्या सिव्हिल हॉस्पिटल, जळगाव येथे उपचार सुरू आहेत.

या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शशिकांत पाटील यांनी डीबी पथक त्वरित रवाना केले. पथकाने अत्यंत कल्पकतेने आणि गुप्त माहितीच्या आधारे शोध घेत अवघ्या १२ तासांच्या आत ३ मुख्य आरोपींना जेरबंद केले. यात सराईत गुन्हेगार व मुख्य आरोपी साहिल शेख जब्बार शेख उर्फ काल्या (वय-२६, रा. पाळधी), विशाल चुडामण पाटील (वय १८, रा. जळगाव), मोहित हेमंत गुजर (वय १९, रा. पिंप्राळा, जळगाव) आणि एक विधीसंघर्षित बालक या चार जणांचा समावेश आहे.

मुख्य आरोपी ‘काल्या’वर यापूर्वीही धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये बस अडवून चालकाला मारहाण केल्याचा गंभीर गुन्हा दाखल आहे, तर आरोपी विशाल पाटील याच्यावर रामानंद नगर पोलीस स्टेशन येथे दरोड्यासारखा गुन्हा दाखल आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, आणि डीवायएसपी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add