Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»मोठी बातमी: प्लास्टिक कच्च्या मालाला भीषण आग; शेकडो टन प्लास्टिक कच्चा माल जळून खाक !

क्राईम

मोठी बातमी: प्लास्टिक कच्च्या मालाला भीषण आग; शेकडो टन प्लास्टिक कच्चा माल जळून खाक !

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraJune 19, 2026Updated:June 19, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | शहरालगत असलेल्या सुप्रीम कॉलनीच्या मागील बाजूस डुब्बन नगरी परिसरात शुक्रवारी प्लास्टिकच्या कच्च्या मालाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत प्लास्टिकचे दाणे तसेच खुर्च्या, चपला आणि इतर प्लास्टिक वस्तू तयार करण्यासाठी साठवून ठेवलेला मोठ्या प्रमाणातील कच्चा माल जळून खाक झाला. सुदैवाने अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी मोकळ्या मैदानात शेकडो टन प्लास्टिक कच्चा माल साठवून ठेवण्यात आला होता. या परिसरातील वीज वितरणाच्या डीपीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ठिणग्या उडाल्या आणि त्यातून प्लास्टिकच्या साठ्याने पेट घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. प्लास्टिक ज्वलनशील असल्याने काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले आणि नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली.

घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे पाच अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेक तास अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. आग विझविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा मारा करण्यात आला.

दरम्यान, आगीमुळे नेमके किती आर्थिक नुकसान झाले याचा अंदाज अद्याप आलेला नसून संबंधित यंत्रणांकडून पंचनामा आणि तपासाची प्रक्रिया सुरू आहे. परिसरात प्लास्टिक भंगार व कच्च्या मालाची अनेक गोदामे असल्याने आग अधिक पसरली असती तर मोठ्या प्रमाणात वित्तहानीसह जीवितहानी होण्याचीही शक्यता होती. मात्र अग्निशमन दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मोठी बातमी : पोलिसांची ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ मोहीम; मुक्ताईनगरातील तीन गावांवर पहाटे धाड, कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026

पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर संतप्त नागरिकांचा एल्गार

June 19, 2026

मुक्ताईनगरात खळबळ! बंदुकीचा धाक दाखवून भंगार व्यावसायिकाला लुटले; विवस्त्र करून व्हिडिओ बनवला

June 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add