Author: Editorial Desk

जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील एका २८ वर्षीय विवाहित महिलेवर ओळखीच्या व्यक्तीने अत्याचार केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून धरणगाव येथील सुनील मधुकर चौधरी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४ व ११५(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपीची ओळख फिर्यादीच्या बहिणीच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये संपर्क वाढला. २४ जून २०२६ रोजी दुपारी जळगाव शहरातील सम्राट पार्क परिसरात फोटो काढण्याच्या बहाण्याने आरोपीने फिर्यादीला कारमध्ये बसविले. त्यानंतर एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवत अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच या घटनेची माहिती कोणाला दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही…

Read More

जळगाव : छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी संस्थेमार्फत राज्यभर ‘कृषी मित्र’ पदासाठी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. जळगावातील एका महाविद्यालयात झालेल्या या परीक्षेसाठी जिल्हाभरातील ३५० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. मात्र परीक्षा सुरू होण्यापूर्वीच भरती प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाल्याने परीक्षास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला. विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, ऑनलाइन अर्ज करताना दरमहा २५ हजार रुपये मानधन मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र परीक्षास्थळी संबंधित समन्वयकांनी ही नोकरी नसून कृषी उत्पादनांच्या विक्रीवर कमिशन मिळेल, अशी माहिती दिली. तसेच अनेक विद्यार्थ्यांना हॉलतिकीटही देण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यास नकार देत भरलेली परीक्षा फी परत करावी आणि…

Read More

जळगाव प्रतिनिधी | आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातून चार हजारांहून अधिक वारकरी बंधू-भगिनींना विशेष रेल्वेद्वारे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी रवाना करण्याचा भव्य भक्तिमय सोहळा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून उत्साहात पार पडला. जी.एस. ग्राऊंड ते जळगाव रेल्वे स्थानक हा संपूर्ण परिसर टाळ-मृदंग, अभंग, हरिनामाच्या गजराने आणि भगव्या पताकांनी दुमदुमून गेला. यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि समतेची जिवंत परंपरा आहे. गेल्या पाच वर्षांपासून हजारो वारकऱ्यांना पंढरपूर दर्शनाची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले. वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही आणि वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई आहे.” कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोप्रेमी ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर…

Read More

पाचोरा प्रतिनिधी | शिवसेना (शिंदे गट)चे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याचा व्हॉइस ऑफ मीडिया, पाचोरा तालुका शाखेतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. संबंधित प्रकरणी तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन पाचोरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार हे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे प्रतिनिधी असून जनतेचे प्रश्न निर्भीडपणे मांडण्याचे कार्य करतात. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी त्यांच्याविषयी अवमानकारक भाषा वापरणे ही संपूर्ण पत्रकारितेचा अपमान असून लोकशाही मूल्यांनाही धक्का देणारी बाब आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे पत्रकारांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक…

Read More

पाचोरा प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा रेल्वे स्थानकाजवळ एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. संभाजीनगर येथील रहिवासी असलेले रवींद्र महाजन यांनी रेल्वेखाली येऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. या आत्महत्येमुळे संपूर्ण परिसरात तीव्र खळबळ उडाली असून, घटनेपूर्वी मृत महाजन यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेला एक व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या आत्महत्येमागील कारणांचा उलगडा करत गंभीर आरोप केले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र महाजन यांचा डॉक्टर समाधान पाटील यांच्याशी आर्थिक व्यवहारावरून मोठा वाद सुरू होता. महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी संबंधित डॉक्टरांना बिनव्याजी पैसे दिले होते, परंतु डॉक्टरांनी ते पैसे परत देण्यास साफ…

Read More

​अमळनेर प्रतिनिधी | शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नगरपालिकेच्या ठेकेदाराने चक्क कचरा वाहून नेणाऱ्या ‘घंटागाडी’चा वापर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अमानुष प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, अमळनेर शहरासह संपूर्ण तालुक्यातून पालिकेच्या असंवेदनशीलतेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरात काही दिवसांपूर्वी एक बेवारस मृतदेह आढळून आला होता. स्थानिक ग्रामीण रुग्णालयात या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, पुढील दोन दिवसांत या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी किंवा ताब्यात घेण्यासाठी कोणतेही नातेवाईक समोर आले नाहीत. शेवटी प्रशासनाने या बेवारस मृतदेहावर विधिवत अंत्यसंस्कार करण्याचा…

Read More

चोपडा प्रतिनिधी | चोपडा तालुक्यातील अवैध वाळू उत्खननासंदर्भातील तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनाची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे. त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करून संपत्तीची ईडी, आयकर विभाग आणि आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह सर्वपक्षीय प्रतिनिधी आणि भारतीय पत्रकार महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन देण्यात आले. तसेच, या मागण्यांसाठी २९ जून रोजी दुपारी १२ वाजता चोपडा तहसील कार्यालयासमोर विराट जनआंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनात तहसीलदारांच्या कार्यकाळात अवैध वाळू व गौण खनिज प्रकरणांमध्ये संशयास्पद दुर्लक्ष, विविध अनियमितता, कर्तव्यात कसूर, नागरिकांशी गैरवर्तन, शासकीय कामकाजातील दिरंगाई तसेच पत्रकारांशी अपमानास्पद वागणूक…

Read More

​जळगाव प्रतिनिधी : येथील गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालयाने शैक्षणिक क्षेत्रात एक मानाचा तुरा रोवला आहे. महाविद्यालयाच्या पहिल्याच बॅचच्या प्रथम वर्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, विद्यार्थ्यांनी तब्बल ९९ टक्के निकालाची नोंद करत उत्तुंग भरारी घेतली आहे. पहिल्याच वर्षी आयुर्वेद महाविद्यालयाचा निकाल एवढा उत्कृष्ट लागल्याने संपूर्ण खान्देशसह विदर्भातही महाविद्यालयाचा नावलौकीक वाढला आहे. ​गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाच्या २०२४-२५ या पहिल्याच बॅचमधील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये अत्यंत चमकदार कामगिरी केली. यामध्ये मनुजा टोपे हिने ७७ टक्के गुण मिळवून महाविद्यालयातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. पहिल्याच वर्षी मिळालेल्या या अभूतपूर्व यशामुळे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गोदावरी…

Read More

नशिराबाद प्रतिनिधी | पत्रकारांना कथितरित्या अश्लाघ्य शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणाचा निषेध करत नशिराबाद पत्रकार संघाने शुक्रवारी नशिराबाद पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना निवेदन सादर केले. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून खासदार संजय दिना पाटील यांच्याविरुद्ध कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा व योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार संघाने केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समाजातील घडामोडी वस्तुनिष्ठपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. अशा परिस्थितीत पत्रकारांशी अपमानास्पद भाषा वापरणे, शिवीगाळ करणे किंवा जीवे मारण्याच्या धमक्या देणे हे प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात करणारे असल्याचे…

Read More

जळगाव प्रतिनिधी । लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेचा सन्मान राखणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची नैतिक जबाबदारी आहे. असे असतानाही खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत वापरलेली आक्षेपार्ह व अवमानकारक भाषा अत्यंत निषेधार्ह आहे, अशी तीव्र भूमिका ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेने’ घेतली आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ संघटनेच्या वतीने जळगावात प्रशासनाला निवेदन देऊन खासदारांवर कठोर कारवाईची आणि त्यांच्या जाहीर माफीची मागणी करण्यात आली आहे. २५ जून रोजी पत्रकारांशी संवाद साधताना खासदार संजय पाटील यांनी पत्रकारांविषयी अत्यंत अवमानकारक शब्दांचा वापर केल्याचे समोर आले आहे. लोकप्रतिनिधीच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण पत्रकार बांधवांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, यामुळे पत्रकारांचा अपमान झाला आहे. हे कृत्य…

Read More