Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»खा.संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याविरोधात व्हॉइस ऑफ मीडियाचे पाचोऱ्यात निवेदन

क्राईम

खा.संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याविरोधात व्हॉइस ऑफ मीडियाचे पाचोऱ्यात निवेदन

Editorial DeskBy Editorial DeskJune 27, 2026Updated:June 27, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

पाचोरा प्रतिनिधी | शिवसेना (शिंदे गट)चे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याचा व्हॉइस ऑफ मीडिया, पाचोरा तालुका शाखेतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. संबंधित प्रकरणी तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन पाचोरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार हे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे प्रतिनिधी असून जनतेचे प्रश्न निर्भीडपणे मांडण्याचे कार्य करतात. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी त्यांच्याविषयी अवमानकारक भाषा वापरणे ही संपूर्ण पत्रकारितेचा अपमान असून लोकशाही मूल्यांनाही धक्का देणारी बाब आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे पत्रकारांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे संघटनेने नमूद केले.

यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया पाचोरा तालुका अध्यक्ष नंदकुमार शेलकर, तालुका कार्याध्यक्ष राहुल महाजन, शहराध्यक्ष प्रवीण बोरसे, तालुका संघटक चिंतामण पाटील, सहसचिव जाविद शेख, ज्येष्ठ पत्रकार अनिल आबा येवले तसेच अनवर शेख उपस्थित होते.

या निवेदनावर व्हॉइस ऑफ मीडियाचे ज्येष्ठ सल्लागार दिलीप जैन, दीपक पवार, दिलीप परदेशी, नरसिंग भुरे, निखील मोर, बाबूलाल पटेल, प्रशांत येवले आणि बंडू सोनार आदींच्या स्वाक्षऱ्या असून पत्रकारांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी प्रशासनाने त्वरित योग्य ती कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add