Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»खा. संजय पाटील यांच्या निषेधार्थ गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेचे आंदोलन

जळगाव

खा. संजय पाटील यांच्या निषेधार्थ गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेचे आंदोलन

Editorial DeskBy Editorial DeskJune 25, 2026Updated:June 25, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी । लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेचा सन्मान राखणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची नैतिक जबाबदारी आहे. असे असतानाही खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत वापरलेली आक्षेपार्ह व अवमानकारक भाषा अत्यंत निषेधार्ह आहे, अशी तीव्र भूमिका ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेने’ घेतली आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ संघटनेच्या वतीने जळगावात प्रशासनाला निवेदन देऊन खासदारांवर कठोर कारवाईची आणि त्यांच्या जाहीर माफीची मागणी करण्यात आली आहे.

२५ जून रोजी पत्रकारांशी संवाद साधताना खासदार संजय पाटील यांनी पत्रकारांविषयी अत्यंत अवमानकारक शब्दांचा वापर केल्याचे समोर आले आहे. लोकप्रतिनिधीच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण पत्रकार बांधवांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, यामुळे पत्रकारांचा अपमान झाला आहे. हे कृत्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पत्रकारांचा सन्मान आणि लोकशाही मूल्यांना थेट बाधा पोहोचवणारे असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

पत्रकार सुरक्षा आणि सन्मानाचा प्रश्न
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, पत्रकार हे समाज आणि प्रशासन यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जनतेचे प्रश्न, समस्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे कार्य पत्रकार प्रामाणिकपणे करत असतात. अशा संवेदनशील परिस्थितीत जबाबदार लोकप्रतिनिधीकडून पत्रकारांबाबत अपमानास्पद भाषा वापरली जाणे हे अत्यंत दुर्दैवी, खेदजनक आणि लोकशाहीला काळिमा फासणारे आहे.

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना, जळगाव जिल्ह्याच्या वतीने खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला आहे. प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा. संबंधित खासदारांवर कायदेशीर व योग्य ती कारवाई करण्यात यावी, त्यांनी पत्रकारांची जाहीर माफी मागावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून पत्रकारांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना कराव्यात यावी अशी आग्रही मागणी गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेकडून करण्यात आली.

या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम, संस्थापक सचिव भगवान सोनार, संस्थापक खजिनदार ललित खरे, जळगाव जिल्हा अध्यक्ष चेतन वाणी, जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत पाटील, जळगाव शहर अध्यक्ष जितेंद्र कोतवाल, पत्रकार मनिष जोग, नरेंद्र पाटील, किशोर पाटील,योगेश सुने,पवन खंबायत, योगेश चौधरी, धर्मेंद्र राजपूत, संदीप वानखेडे, निखिल वाणी विकास पात्रे, नाजनिन शेख, कल्पेश हिरवळकर, जगमोहसिंग ठाकुर, यांच्या सह पत्रकार उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ व तरुण पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add