Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»नागझिरी नदीची समस्या सुटेना! ३० लाखांचा निधी खर्चूनही नदीपात्र गाळातच

क्राईम

नागझिरी नदीची समस्या सुटेना! ३० लाखांचा निधी खर्चूनही नदीपात्र गाळातच

Editorial DeskBy Editorial DeskJune 25, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

रावेर प्रतिनिधी । रावेर शहरातून वाहणाऱ्या नागझिरी नदीला काल आलेल्या पहिल्याच पुरामुळे नगरपालिकेच्या नालेसफाई आणि गाळ काढण्याच्या संथ कारभाराचे वाभाडे निघाले आहेत. यावर्षी नदीची साफसफाई व गाळ काढण्यासाठी पालिकेने सुमारे ३० लाख रुपयांच्या कामांना मंजुरी दिली होती. मात्र, प्रत्यक्ष कामात झालेल्या कमालीच्या दिरंगाईमुळे पहिल्याच पावसात शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली असून, पालिका प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या पालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्यामुळे या कामांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचा आरोप केला जात आहे.

नागझिरी नदीला दरवर्षी पावसाळ्यात पूर येत असल्याने नदीचे खोलीकरण व गाळ काढण्यावर लाखो रुपये खर्च केले जातात. परंतु, यंदा शहरातील संभाजी चौक, पंचशील चौक आणि सावदा रोड पूल परिसरात नदीपात्र गाळाने पूर्णपणे भरले आहे. त्यामुळे पूल आणि नदीच्या तळातील अंतर अवघ्या काही मीटरवर आले आहे. परिणामी, काल आलेल्या पुराचे पाणी नदीकाठ ओलांडून थेट नागरिकांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरले. नदी संवर्धन अभ्यासकांच्या मते, जर नदीपात्रातील गाळ नियमितपणे उपसून प्रवाह सुरळीत ठेवला, तर पुराचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी करता येऊ शकतो. मात्र रावेरमध्ये दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च केवळ कागदावरच जिरवला जात असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

या गंभीर परिस्थितीवर बोलताना पालिकेचे अनुभवी नगरसेवक पद्माकर महाजन म्हणाले की, “नागझिरी नदीच्या संवर्धनासाठी विशेष उपाययोजना करण्याचा आमचा मानस आहे. मात्र, सध्या निधीच्या अभावामुळे कामे करण्यात प्रचंड अडचणी येत आहेत. तरीही या समस्येवर कायमस्वरूपी मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न राहील.” सध्या पावसाळा सुरू असून पालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ नाही, त्यामुळे सुजान नागरिकांनी प्लास्टिक व कचरा उघड्या गटारीत टाकू नये, जेणेकरून पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल, असे आवाहनही त्यांनी केले.

महाजन यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देतानाच रावेरकरांनी पालिकेच्या एकूणच कार्यपद्धतीवर बोट ठेवले आहे. “आम्ही पालिकेला पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत, परंतु पालिकेची कामे दर्जेदार व्हायला हवीत. स्थानिक राजकारण बाजूला ठेवून शहराबाहेरील चांगल्या आणि अनुभवी ठेकेदारांना ही कामे द्यावीत, जेणेकरून नालेसफाईची कामे प्रामाणिकपणे होतील आणि शहराची या त्रासातून कायमची सुटका होईल,” अशी रोकठोक मागणी सुजाण नागरिकांनी केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add