Author: Editorial Desk

​जळगाव प्रतिनिधी | जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पहाटेच्या सुमारास केलेल्या एका अत्यंत नियोजनबद्ध आणि धडक कारवाईत बेकायदेशीर गोवंश कत्तलीच्या कथित रॅकेटला मोठा धक्का दिला आहे. शहरातील पारधीवाडा आणि जपान जिन या दोन वेगवेगळ्या संवेदनशील परिसरांमध्ये पोलिसांनी एकाच वेळी छापे टाकून ही मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर गोवंश मांस, कत्तलीसाठी लागणारी घातक हत्यारे आणि इतर साहित्य जप्त केले आहे. तसेच, कत्तलखान्यातून ३ जिवंत बैलांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. ​मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, ही विशेष मोहीम अत्यंत गुप्ततेने राबविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण ११ संशयित आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले आहे. यामध्ये प्रामुख्याने हसनखान गुलाबखान पठाण (वय ६५), मोहसीन खान…

Read More

जळगाव प्रतिनिधी | लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेले अकोला येथील मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या जळगाव येथील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या ‘इन-कॅमेरा’ झाडाझडतीत तब्बल २ कोटी ९४ लाख ६४ हजार ८४७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक व जळगाव एसीबीच्या आठ ते दहा अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ही सखोल तपासणी केली. झाडाझडती दरम्यान घरातून १ कोटी ५३ लाख ८४ हजार ६३० रुपयांची रोख रक्कम, ४२२.१०० ग्रॅम सोन्याचे ६० लाख ५७ हजार १३५ रुपयांचे दागिने, तसेच १५४.५०० ग्रॅम चांदीचे ३१ हजार ४१६ रुपयांचे दागिने आढळून आले. याशिवाय ११ लाख…

Read More

जामनेर प्रतिनिधी | रस्त्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची घटना जामनेर तालुक्यातील वाकोद येथे घडली. या प्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन साहेबराव जोशी (वय ३०, रा. वाकोद, ता. जामनेर) यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. १ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ते त्यांच्या घरासमोर उभे असताना संशयित आरोपी कैलास आत्माराम जोशी व विलास आत्माराम जोशी यांनी मोटारसायकल घेऊन जाताना रस्त्याच्या कारणावरून वाद घातला. यावेळी आरोपींनी शिवीगाळ करून धमकावल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. काही वेळाने दोन्ही आरोपी पुन्हा घटनास्थळी आले. त्यापैकी एकाने लोखंडी कुऱ्हाड, तर…

Read More

जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा पोलीस दलाने बेकायदेशीर शस्त्रास्त्रांच्या वाहतुकीविरुद्ध एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने एका आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत एक गावठी पिस्तूल, दोन मॅगझिन, तीन मोबाईल आणि एक कार असा एकूण ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या अंमलदारांना गुप्त बातमीदारामार्फत एक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली होती. काही संशयित इसम कारमधून विनापरवाना गावठी कट्टा घेऊन लासूर-चुंचाळे मार्गे चोपडा शहराकडे येत असल्याची ती माहिती होती. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने चोपडा-लासूर-चुंचाळे रस्त्यावरील शनिमंदिर परिसरात सापळा रचला. ​सायंकाळी…

Read More

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहरातील यावल रोड परिसरामध्ये एक धाडसी घरफोडीची घटना समोर आली आहे. येथील ‘पटेल बिअर शॉपी’ नावाचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सीसीटीव्ही युनिटच्या डीव्हीआरसह रोख रक्कम असा एकूण ११ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, बलवंतसिंग बहादूरसिंग पटेल (वय ५५ वर्षे, रा. अकलूद, ता. यावल, जि. जळगाव) यांचे भुसावळ शहरातील बिअर शॉपीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद करून गेल्यानंतर, अज्ञात चोरांनी संधी साधून दुकानाचे मुख्य कुलूप तोडले. तसेच खिडकीचे लोखंडी गज कापून आत प्रवेश केला. दुकानात शिरल्यानंतर चोरांनी आपला सुगावा लागू नये आणि पुरावा नष्ट…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील मयूर कॉलनी येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ८७ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने आणि नगदी ३० हजार रुपयांचा समावेश आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश श्रीराम ठाकूर (वय ५४, रा. शिवा अपार्टमेंट, शिव कॉलनी, जळगाव) यांचे पिंप्राळा येथील मयूर कॉलनीत घर आहे. २८ जून रोजी दुपारी १:३० वाजेपासून ते १ जुलै रोजी सकाळी ८:४० वाजेच्या दरम्यान फिर्यादींचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.…

Read More

पाचोरा प्रतिनिधी | पाचोरा शहरात अन्न सुरक्षा विभाग आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या धडक कारवाईत प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत सुमारे ४ लाख ९८ हजार रुपये किमतीचा गुटखा-पानमसाला आणि ४ लाख रुपये किमतीची चारचाकी कार असा एकूण जवळपास ९ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील पुनगाव रोडवरील आशीर्वाद रेसिडेन्सी परिसरात उभी असलेल्या एका चारचाकी वाहनात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा व पानमसाला मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती जळगाव येथील…

Read More

अमळनेर प्रतिनिधी | पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर शहरात आज पोलिसांनी विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबवत मोठी कारवाई केली. अचानक करण्यात आलेल्या या धडक मोहिमेमुळे शहरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे दिसून आले.या विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांनी एकूण ११० आरोपींची पडताळणी केली. त्यापैकी ७० आरोपी आढळून आले, तर १२ फरार आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तसेच ७ नॉन-बेलेबल वॉरंट आणि ९ बेलेबल वॉरंट प्रकरणांमध्येही कारवाई करण्यात आली. अवैध दारूविरोधातील मोहिमेत ८ ठिकाणी हातभट्टीवर धाडी टाकून सुमारे २,६५० लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. याशिवाय दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे सुमारे १२ हजार लिटर रसायन नष्ट…

Read More

जळगाव प्रतिनिधी | नशिराबाद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चार वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचाराच्या पोक्सो प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला दोन महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. या प्रकरणात २०२२ मध्ये नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित चार वर्षीय बालिकेवर तिच्याच २८ वर्षीय नातेवाईकाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. तपास पूर्ण झाल्यानंतर ९ फेब्रुवारी २०२२ रोजी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले, तर २४ जून रोजी आरोप निश्चित करण्यात आले. या खटल्याचा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी.…

Read More

भुसावळ प्रतिनिधी | रेल्वे रुळाशेजारी आढळलेल्या संतोष रघुवीर मंचाल यांच्या हत्येचा भुसावळ शहर पोलिसांनी पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली आहे. रेल्वेचे लोखंडी स्क्रॅप चोरी करण्याच्या वादातून ही हत्या झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत ढेरे यांनी भुसावळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, २८ जून रोजी रात्री भुसावळ शहराजवळील रेल्वे मार्गालगतच्या दुर्गम ठिकाणी संतोष मंचाल यांचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र घटनास्थळी कोणतेही हत्यार, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा तांत्रिक पुरावे नसल्याने तपास पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरला. घटनेची गंभीर दखल घेत…

Read More