Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»​एलसीबीचा पहाटेचा धडक छापा; बेकायदेशीर गोवंश कत्तलीच्या दोन ठिकाणांवर मोठी कारवाई

क्राईम

​एलसीबीचा पहाटेचा धडक छापा; बेकायदेशीर गोवंश कत्तलीच्या दोन ठिकाणांवर मोठी कारवाई

Editorial DeskBy Editorial DeskJuly 3, 2026Updated:July 3, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​जळगाव प्रतिनिधी | जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पहाटेच्या सुमारास केलेल्या एका अत्यंत नियोजनबद्ध आणि धडक कारवाईत बेकायदेशीर गोवंश कत्तलीच्या कथित रॅकेटला मोठा धक्का दिला आहे. शहरातील पारधीवाडा आणि जपान जिन या दोन वेगवेगळ्या संवेदनशील परिसरांमध्ये पोलिसांनी एकाच वेळी छापे टाकून ही मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर गोवंश मांस, कत्तलीसाठी लागणारी घातक हत्यारे आणि इतर साहित्य जप्त केले आहे. तसेच, कत्तलखान्यातून ३ जिवंत बैलांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.

​मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, ही विशेष मोहीम अत्यंत गुप्ततेने राबविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण ११ संशयित आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले आहे. यामध्ये प्रामुख्याने हसनखान गुलाबखान पठाण (वय ६५), मोहसीन खान हसनखान पठाण (वय ३५), फराज खान हमीदखान कुरेशी (वय २०), अर्षदखान अजीजखान कुरेशी (वय ४८), रियाज अहमद अब्दुल शकुर कुरेशी (वय ५५), तन्वीर शेख ताहेर कुरेशी (वय ४१), जावेद खान सुलेमानखान कुरेशी (वय ५०), अब्दुल शेख नुरा कुरेशी (वय ५०), अजीज शेख नजीर कुरेशी, अल्ताफखान अजीजखान कुरेशी (वय ५६), शरीफ शेख अकबर कुरेशी (वय २५) यांना अटक करण्यात आली आहे.

तर घटनास्थळावरून सहा संशयित आरोपी पसार झाले, यात इकबाल शेख आहत शेख कुरेशी, जहांगीर शेख साबीर शेख कुरेशी, आरीफ अजीज कुरेशी, जाबीर खान अब्बासखान कुरेशी, जहीरखान जाबीरखान कुरेशी, शरीफ खान मजीदखान कुरेशी यांचा समावेश आहे. त्याचा पोलीस पथके सध्या त्यांचा कसून शोध घेत आहेत.

​या धडक कारवाई दरम्यान पोलिसांनी विविध वयोगटातील गोवंशाचे एकूण १५७५ किलो मांस जप्त केले, ज्याची बाजारभावाप्रमाणे अंदाजित किंमत ३ लाख १५ हजार रुपये आहे. कत्तलखान्यातून ४ लोखंडी कुऱ्हाडी, ९ सुऱ्या, ६ कोयते आणि २ वजन काटे असे साहित्यही हस्तगत करण्यात आले आहे. तसेच जपान जिन भागातील एका पत्र्याच्या शेडमधून सुटका करण्यात आलेल्या ३ पांढऱ्या गावरान बैलांची किंमत सुमारे १ लाख ५५ हजार रुपये आहे. पोलिसांनी या कारवाईत एकूण ४ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

​कारवाईनंतर तातडीने पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश वाठोरे यांना पाचारण करून जप्त मांसाचे नमुने सीलबंद करण्यात आले आहेत. उर्वरित मांस अमळनेर नगर परिषदेच्या मदतीने पंचांसमक्ष खड्डा खोदून शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आले. सुटका केलेल्या तिन्ही बैलांना सुरक्षितरित्या गोशाळेत जमा करण्यात आले असून, फरार आरोपींचा शोध आणि पुढील कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add