Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»आरोग्य»कर्तृत्वाचा धडाका आणि विकासाचे व्हिजन असणारे नेतृत्व : महापौर दीपमाला काळे

आरोग्य

कर्तृत्वाचा धडाका आणि विकासाचे व्हिजन असणारे नेतृत्व : महापौर दीपमाला काळे

Editorial DeskBy Editorial DeskJuly 13, 2026Updated:July 13, 2026No Comments3 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगावच्या कार्यक्षम महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख

खान्देशचे हृदय असलेल्या जळगाव शहराला एक नवी दिशा देणाऱ्या, जळगाव शहर महानगरपालिकेच्या १७ व्या महापौर दीपमाला काळे यांचा १३ जुलै रोजी वाढदिवस आहे. ६ फेब्रुवारी रोजी जळगावच्या महापौरपदाची धुरा सांभाळल्यापासून त्यांनी आपल्या कामाचा एक वेगळा आणि आश्वासक ठसा जळगावकरांच्या मनावर उमटवला आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, त्यांनी घेतलेले धडाकेबाज निर्णय आणि जळगाव शहरासाठी आखलेल्या ‘विकास व्हिजन’चा घेतलेला हा विशेष आढावा.

कर्तव्याची १५० हून अधिक पावले आणि ‘पंचसूत्री’वर भर

पदभार स्वीकारल्यापासून अत्यंत कमी कालावधीत महापौरांनी केवळ खुर्चीवर न बसता, प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरून काम करण्याला प्राधान्य दिले आहे. जळगाव शहराच्या शाश्वत प्रगतीसाठी त्यांनी ‘आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, अतिक्रमण निर्मूलन आणि मनपाचा महसूल वाढविणे’ ही पंचसूत्री समोर ठेवली आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठांमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी त्यांनी केलेली अतिक्रमण विरोधी मोहीम असो, की ‘माझे दुकान, माझी कचराकुंडी’ हे आवाहन करून सुरू केलेले ‘मार्केट स्वच्छता अभियान’ असो; त्यांच्या प्रत्येक निर्णयात जळगावला एक शिस्तबद्ध आणि सुंदर शहर बनवण्याची तळमळ दिसून येते.

विठ्ठल भक्ती आणि सामाजिक संदेश: सायकल वारीचे सलग दुसरे वर्ष

महापौर दीपमाला काळे या केवळ एक उत्तम प्रशासक नाहीत, तर त्या फिटनेस आणि पर्यावरण संवर्धनाच्या पुरस्कर्त्या आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने ९ ते ११ जुलै  दरम्यान त्यांनी जळगाव ते पंढरपूर हा प्रवास सायकलने करून आपली विठ्ठल भक्ती आणि सायकल वारीचे सलग दुसरे वर्ष पूर्ण केले आहे.

या सायकल वारीच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला ‘सुदृढ आरोग्य आणि पर्यावरण संवर्धन’ (इंधन बचत) हा अत्यंत महत्त्वाचा सामाजिक संदेश दिला आहे. स्वतः सायकल चालवून त्यांनी जळगावच्या तरुण पिढीसमोर आरोग्याचा एक नवा आदर्श ठेवला आहे.

जळगावच्या भविष्याचा ‘रोडमॅप’ (विकास व्हिजन)

आगामी काळात जळगावला राज्याच्या नकाशावर आघाडीचे शहर बनवण्यासाठी महापौरांनी दूरगामी नियोजन केले आहे.

डिजिटल प्रशासन: महापालिकेचा कारभार पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी संपूर्ण प्रणाली ऑनलाईन करणे.
पायाभूत सुविधा : ‘अमृत’ पाणीपुरवठा योजनेची १००% पूर्तता करून प्रत्येक घराला शुद्ध पाणी देणे आणि पावसाळी पाण्याचा निचरा करणारी सक्षम ड्रेनेज यंत्रणा उभारणे.
हरित जळगाव : प्रदूषण रोखण्यासाठी शहरात ‘मियावाकी’ पद्धतीने दाट जंगले उभारणे आणि उद्यानांचे सुशोभीकरण करणे.

जनसामान्यांशी जोडलेली नाळ

महापौर दीपमाला काळे यांच्या स्वभावातील नम्रता, अभ्यासू वृत्ती आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न ऐकून घेऊन ते जागेवरच सोडवण्याचा त्यांचा धडाका यामुळे त्या अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा नगररचना विभागाचे मंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, जिल्ह्याचे नेते तथा राज्याचे मंत्री गिरीशभाऊ महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्या जळगावसाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणून विकासकामे मार्गी लावत आहेत.

संकल्प विठ्ठल चरणी, सदिच्छा जळगावकरांची!

नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर सायकल वारीमध्ये त्यांनी विठू माऊलीच्या चरणी जळगावच्या समृद्धीचे आणि बळीराजाच्या सुखाचे साकडे घातले आहे. अशा या विठ्ठलभक्त, कार्यक्षम, कर्तव्यदक्ष आणि जळगावच्या लाडक्या महापौर दीपमाला काळे यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!

त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून जळगाव शहराची अशीच अविरत सेवा घडत राहो, हीच जळगावकरांच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना!

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add