यावल प्रतिनिधी | यावल तालुक्यातील वड्री गावाजवळ एका युवकाचा विहिरीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सिकंदर इस्माईल उर्फ गफ्फार तडवी असे मृत युवकाचे नाव असून, कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वड्री गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील बाळकृष्ण सदाशिव यांच्या शेतातील विहिरीत शेतमालक कामासाठी गेले असता त्यांना मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी तातडीने ग्रामस्थांना व यावल पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. यावल पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला. प्राथमिक माहितीनुसार, सिकंदर तडवी यांनी त्यांची शाहीन दुचाकी यावल येथे…
Author: Editorial Desk
वरणगाव प्रतिनिधी | जिल्ह्यात अवैध गुटखा तस्करीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत वरणगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन असा एकूण ५ लाख २७ हजार ६८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई सुरू असून, त्यानुसार वरणगाव पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर विशेष पथकाने सापळा रचला. नशिराबाद परिसरात संशयित वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या…
जळगाव प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागातर्फे आयोजित ‘शिक्षण संवाद २०२६’ या राज्यस्तरीय कार्यशाळेत जळगाव जिल्ह्यातील योगाचार्य डॉ. देवानंद सोनार यांनी ‘शालेय स्तरावर योग आणि अध्यात्म’ या महत्त्वपूर्ण विषयावर आपले विचार मांडले. योग शिक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांच्या सूचनांना उपस्थित मान्यवरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मुंबई येथील जवाहर बालभवन येथे आयोजित या एकदिवसीय कार्यशाळेचे अध्यक्षस्थान राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी भूषविले. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत पार पडलेल्या या कार्यक्रमात शिक्षण विभागाचे आयुक्त, बालभारतीचे संचालक, शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ उपस्थित होते. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून कला, क्रीडा, संगीत, शिक्षण, योग आणि अध्यात्म क्षेत्रातील…
यावल प्रतिनिधी | येथील आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालयात शासकीय कामात अडथळा निर्माण करून प्रकल्प अधिकाऱ्याला शिवीगाळ, धमकी व धक्काबुक्की केल्याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शासकीय कार्यालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक प्रकल्प अधिकारी जावेद इस्माईल तडवी यांनी यावल पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, 23 ते 24 जुलैदरम्यान आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात शासकीय काम सुरू असताना आरोपी साहिल उर्फ संजय हमीद तडवी (वय 50) व रोहन साहिल तडवी (वय 30, रा. फैजपूर, ता. यावल) यांनी कार्यालयात येऊन कर्मचाऱ्यांशी व अधिकाऱ्यांशी वाद घातला. यावेळी त्यांनी शिवीगाळ करून धमक्या…
भुसावळ प्रतिनिधी | आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वारकऱ्यांसाठी भुसावळ ते पंढरपूर विशेष मोफत रेल्वे सेवा यंदाही सुरू करण्यात आली आहे. खासदार रक्षाताई खडसे यांच्या पुढाकारातून गेल्या १२ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या उपक्रमामुळे हजारो भाविकांना पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी सुरक्षित, सोयीस्कर आणि मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध होत आहे. दरवर्षी आषाढी वारीसाठी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरकडे रवाना होतात. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि प्रवास अधिक सुलभ व्हावा या उद्देशाने ही विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल भाविकांनाही कोणताही अतिरिक्त खर्च न करता पंढरपूरला जाण्याची संधी मिळत असल्याने वारकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी खासदार रक्षाताई खडसे…
जळगाव प्रतिनिधी | धरणगाव-जळगाव मार्गावरील श्री स्वामी समर्थ फ्लोअर मिलजवळ शुक्रवारी दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास एसटी बस, आयशर आणि खडीने भरलेल्या ट्राला यांच्यात भीषण तिहेरी अपघात झाला. या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, वाहन ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की आवाज दूरपर्यंत ऐकू गेला. धडकेनंतर खडीने भरलेला ट्राला रस्त्यावर पलटी झाल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. शिरपूर आगाराची एमएच-20 बीएल-2736 क्रमांकाची एसटी बस जळगावहून शिरपूरकडे जात होती. त्याच मार्गावर…
जळगाव प्रतिनिधी | रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंप्राळा परिसरात असलेल्या सोमानी मार्केटमधील पान मसाल्याचे दुकान फोडणाऱ्या दोन संशयित आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ७ जुलै च्या रात्री अज्ञात चोराने दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. दुकानातील विविध कंपन्यांचे ३३ हजार रुपये किमतीचे सिगारेटचे १० बॉक्स आणि रोख ५ हजार रुपये असा एकूण ३७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी तक्रारदार सुरेश नरवाडे यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलीस अंमलदार सुधाकर अंभोरे आणि सुशील चौधरी यांनी…
भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहरातील महावितरण कार्यालयात कार्यरत अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन अभिमन्यू पाटील (वय ४५) यांना दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महावितरण विभागात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या पत्नीच्या नावावर सोलर सिस्टीम बसविण्याची योजना सुरू होती. संबंधित दोन ग्राहकांच्या सोलर सिस्टीमची मंजुरी व रिलिज ऑर्डर देण्यासाठी नितीन पाटील यांनी प्रत्येकी एक हजार रुपये, अशा एकूण दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला.…
अमळनेर प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून जळगाव जिल्ह्यातील अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका अत्यंत अनोख्या आणि भव्य स्मारकाचे अनावरण करण्यात आले. बैलगाडी हाकणाऱ्या शेतकरी वेशातील अजितदादांचा हा राज्यातील पहिलाच पूर्णाकृती पुतळा असून, सध्या या आगळ्यावेगळ्या स्मारकाची अमळनेरसह संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित
जळगाव प्रतिनिधी | स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जळगावातील शिवकॉलनी येथील पक्ष कार्यालयात सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भावपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विविध राजकीय पक्षांच्या मान्यवरांनी उपस्थित राहून स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजूमामा भोळे होते. त्यांच्या हस्ते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर महापौर दीपमाला काळे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे जिल्हाध्यक्ष संजय पवार, नेत्या प्रतिभा शिंदे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, कल्पिताताई पाटील, मंगला पाटील, नगरसेविका सिंधुताई कोल्हे, नगरसेविका वैशाली पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अशोक लाडवंजारी, विनोद देशमुख तसेच भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी…

