Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»महावितरणचा लाचखोर अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला रंगेहात पकडले !

जळगाव

महावितरणचा लाचखोर अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला रंगेहात पकडले !

Editorial DeskBy Editorial DeskJuly 22, 2026Updated:July 22, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहरातील महावितरण कार्यालयात कार्यरत अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन अभिमन्यू पाटील (वय ४५) यांना दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महावितरण विभागात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराच्या पत्नीच्या नावावर सोलर सिस्टीम बसविण्याची योजना सुरू होती. संबंधित दोन ग्राहकांच्या सोलर सिस्टीमची मंजुरी व रिलिज ऑर्डर देण्यासाठी नितीन पाटील यांनी प्रत्येकी एक हजार रुपये, अशा एकूण दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच नितीन पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात सुरू करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add