Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»आरोग्य»‘शिक्षण संवाद २०२६’ कार्यशाळेत योगाचार्य डॉ. देवानंद सोनार यांचा सहभाग

आरोग्य

‘शिक्षण संवाद २०२६’ कार्यशाळेत योगाचार्य डॉ. देवानंद सोनार यांचा सहभाग

Editorial DeskBy Editorial DeskJuly 25, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागातर्फे आयोजित ‘शिक्षण संवाद २०२६’ या राज्यस्तरीय कार्यशाळेत जळगाव जिल्ह्यातील योगाचार्य डॉ. देवानंद सोनार यांनी ‘शालेय स्तरावर योग आणि अध्यात्म’ या महत्त्वपूर्ण विषयावर आपले विचार मांडले.

योग शिक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांच्या सूचनांना उपस्थित मान्यवरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मुंबई येथील जवाहर बालभवन येथे आयोजित या एकदिवसीय कार्यशाळेचे अध्यक्षस्थान राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी भूषविले. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत पार पडलेल्या या कार्यक्रमात शिक्षण विभागाचे आयुक्त, बालभारतीचे संचालक, शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ उपस्थित होते.

राज्यातील विविध जिल्ह्यांमधून कला, क्रीडा, संगीत, शिक्षण, योग आणि अध्यात्म क्षेत्रातील निवडक तज्ज्ञांना या कार्यशाळेसाठी निमंत्रित करण्यात आले होते. शालेय शिक्षण अधिक प्रभावी, संस्कारक्षम आणि विद्यार्थीकेंद्रित करण्याच्या उद्देशाने विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

जळगावच्या मू. जे. महाविद्यालयातील सोहम योग विभागाचे संचालक डॉ. देवानंद सोनार यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योग आणि अध्यात्माचा अभ्यासक्रमात प्रभावी समावेश करण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी मांडलेल्या सूचना शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांसमोर सादर करण्यात आल्या.

या राज्यस्तरीय कार्यशाळेत सहभागाबद्दल केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, शैक्षणिक संचालिका डॉ. मृणालिनी फडणवीस, मू. जे. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य के. पी. नारखेडे, तसेच योग क्षेत्रातील मान्यवर आणि योगसाधकांनी डॉ. देवानंद सोनार यांचे अभिनंदन केले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add