Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»स्वर्गीय अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय नेत्यांचे अभिवादन; आठवणींना उजाळा

जळगाव

स्वर्गीय अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय नेत्यांचे अभिवादन; आठवणींना उजाळा

Editorial DeskBy Editorial DeskJuly 22, 2026Updated:July 22, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जळगावातील शिवकॉलनी येथील पक्ष कार्यालयात सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भावपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विविध राजकीय पक्षांच्या मान्यवरांनी उपस्थित राहून स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजूमामा भोळे होते. त्यांच्या हस्ते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर महापौर दीपमाला काळे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे जिल्हाध्यक्ष संजय पवार, नेत्या प्रतिभा शिंदे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, कल्पिताताई पाटील, मंगला पाटील, नगरसेविका सिंधुताई कोल्हे, नगरसेविका वैशाली पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अशोक लाडवंजारी, विनोद देशमुख तसेच भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक कार्यकर्त्याला आधार देणारे, संकटसमयी मदतीला धावून जाणारे आणि माणुसकी जपणारे नेतृत्व म्हणून अजितदादा कायम स्मरणात राहतील, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.

उमेदीच्या काळात त्यांचे अकाली निधन ही समाज आणि राजकीय क्षेत्रासाठी मोठी हानी असल्याचेही वक्त्यांनी नमूद केले. त्यांच्या कार्यपद्धती, सर्वसामान्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली आत्मीयता यांचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांना भावपूर्ण अभिवादन केले. कार्यक्रमाला विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add