Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»वरणगाव पोलिसांची धडक कारवाई; ५.२७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

क्राईम

वरणगाव पोलिसांची धडक कारवाई; ५.२७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

Editorial DeskBy Editorial DeskJuly 25, 2026Updated:July 25, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

वरणगाव प्रतिनिधी | जिल्ह्यात अवैध गुटखा तस्करीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत वरणगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन असा एकूण ५ लाख २७ हजार ६८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई सुरू असून, त्यानुसार वरणगाव पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर विशेष पथकाने सापळा रचला. नशिराबाद परिसरात संशयित वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांसह माल वाहतुकीसाठी वापरलेले वाहनही समाविष्ट आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add