Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»पाणी बचतीसाठी मनपा प्रशासनाला गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे निवेदन

जळगाव

पाणी बचतीसाठी मनपा प्रशासनाला गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे निवेदन

Editorial DeskBy Editorial DeskJuly 21, 2026Updated:July 21, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी । अल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यात संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन जळगाव शहरातील पिण्याच्या पाण्याची नासाडी रोखण्यासाठी गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे आज जळगाव महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे आणि आयुक्त आदित्य जिवने यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात शहरातील सार्वजनिक, खाजगी पिण्याच्या पाण्याच्या नळांना तातडीने तोट्या बसविणे, पाणी वाया घालवणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणे, पाणी बचतीबाबत जनजागृती मोहीम राबविणे, तसेच विशेष तपासणी पथके नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली होती.

निवेदनाची दखल घेत महापौर दीपमाला काळे आणि आयुक्त आदित्य जीवने यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देत विशेष पथक नेमून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच महापौर दीपमाला काळे यांनी जळगावकर नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करून पाणी बचतीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

यावेळी गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक महासचिव भगवान सोनार, जिल्हाध्यक्ष चेतन वाणी, शहराध्यक्ष जितेंद्र कोतवाल, हेमंत पाटील, योगेश चौधरी, वसीम खान, योगेश सुने, काशिनाथ चव्हाण, विश्वजीत चौधरी, निलेश वाणी, भारती म्हस्के, विकास पात्रे, राहुल शिरसाळे, मनोहर बडगुजर, नंदू बडगुजर तसेच इतर पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महानगरपालिकेने या निवेदनाची तातडीने दखल घेतल्यामुळे आगामी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणी बचतीसाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचा मार्ग मोकळा झाल्याची भावना उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केली.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add