Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»जळगावात पुन्हा भीषण अपघात : दोन जण गंभीर जखमी

क्राईम

जळगावात पुन्हा भीषण अपघात : दोन जण गंभीर जखमी

Editorial DeskBy Editorial DeskJuly 17, 2026Updated:July 17, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी : जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील रेमंड चौफुली जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने पुढे जात असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी 17 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. जखमी झालेल्या दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर कडून जळगाव शहरात येणारा ट्रक (क्रमांक टीएन 47 एक्यू 8403) याने पुढे जात असलेल्या दुचाकीवरील दोघांना मागून जोरदार धडक दिली. या धडकेत शेखर ईश्वर सपकाळे (वय 25, रा.धामणगाव तालुका जळगाव) आणि पीयुष प्रदीप बेंडाळे (वय-20, रा.अयोध्या नगर जळगाव) हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

एमआयडीसीतील एका कंपनीतून काम आटपून दोघे दुचाकीने घरी जात असताना हा अपघात घडला आहे. अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली आणि जखमी झालेल्या लोकांना खाजगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांवर उपचार सुरू असून यासंदर्भात पोलिसात अद्याप कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add