
आमदार राजुमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश
आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यभरात भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असून अशातच सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक भास्कर पाटील यांनी आमदार राजुमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला. जळगाव शहरातील जि.एम.फाऊंडेशन येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
भास्कर पाटील यांनी आपल्या सेवाकाळात अनेक गंभीर आणि क्लिष्ट गुन्ह्यांचा छडा लावत पोलीस दलाची प्रतिमा उंचावली. त्यांच्या कार्यामुळे जळगाव शहर व परिसरात त्यांचा मोठा जनसंपर्क निर्माण झाला असून सर्व समाजघटकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वासाचे नाते आहे.दरम्यान, भास्कर पाटील आगामी निवडणुकीत ते थेट मैदानात उतरण्याची दाट शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तवली जात आहे.


