Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»शाळकरी मुलीचा विनयभंग; तीन तरुणांविरुद्ध ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

क्राईम

शाळकरी मुलीचा विनयभंग; तीन तरुणांविरुद्ध ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraApril 24, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील गारखेडा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे शाळेत जाणाऱ्या एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी तीन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील पाच ते सहा महिन्यांपासून त्रास सुरूच होता. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

जामनेर तालुक्यातील एका गावात पीडित विद्यार्थिनी दररोज शाळेत जात असताना, संशयित आरोपी मनीष विजय पाटील, योगराज आणि रितेश दिनेश गोलाईत हे तिला अडवून अश्लील कमेंट्स करत होते. संशयित आरोपींचे हे कृत्य मागील पाच ते सहा महिन्यांपासून सुरू होते, ज्यामुळे पीडित विद्यार्थिनी मानसिक तणावाखाली होती. अखेर, त्रासाचा कळस झाल्यामुळे पीडितेने आपल्या पालकांना विश्वासात घेऊन जामनेर पोलीस स्टेशन गाठले.

पीडितेच्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मनीष विजय पाटील, योगराज आणि रितेश दिनेश गोलाईत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील करत आहेत.

crime Jalgaon crime Jalgaon police jamner jamner crime
Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026

पुण्यात लपून बसलेला जळगावचा फरार आरोपी जेरबंद; जळगाव एलसीबीची मोठी कारवाई

May 19, 2026

जळगाव मनपामध्ये दर बुधवारी ‘नो-व्हेईकल डे’ पाळणार ! : महापौर

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add