जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरात आकाशवाणी चौकात बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या सामानाची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरात खळबळ उडाली आहे.
दुर्गा रवींद्र राठोड (वय ३०, रा. देवजारी कॉलनी, सेंधवा, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) या २७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील आकाशवाणी चौक परिसरातून प्रवास करत होत्या. या प्रवासादरम्यान, अज्ञात चोरट्याने फिर्यादीची कोणतीही संमती नसताना बसच्या डिक्कीमध्ये ठेवलेल्या सामानाला लक्ष्य केले. संधी साधून चोरट्याने डिक्की उघडली आणि त्यातील मौल्यवान ऐवज लंपास केला. त्यात सोन्याचे पेंडल, सोन्याचे मणी आणि रोकड असा एकुण १२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार समोर आल्यानंतर महिलेने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हवालदार रवींद्र ठाकरे करत आहेत.



