Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»धक्कादायक : तरुणीला निर्जन स्थळी नेऊन विवस्त्र करण्याचा प्रयत्न

क्राईम

धक्कादायक : तरुणीला निर्जन स्थळी नेऊन विवस्त्र करण्याचा प्रयत्न

Editorial DeskBy Editorial DeskMay 1, 2026Updated:May 1, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

​जळगाव प्रतिनिधी | शहरातील खोटे नगर परिसरातील हॉटेल आशीर्वाद जवळ एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न करून तिला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

​
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी ही खासगी नोकरी करते. १० एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास संशयित आरोपी भागवत गोविंद चव्हाण (रा. वाघ नगर, जळगाव) याने पीडितेस खोटे नगर परिसरातील एका निर्जन स्थळी असलेल्या काटेरी झुडपात नेले. “तू मला खूप आवडतेस” असे म्हणत आरोपीने पीडितेला मिठी मारून अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. पीडितेने या कृत्यास विरोध केला असता, आरोपीने तिला जमिनीवर पाडून विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला.

पीडितेने हिमतीने प्रतिकार सुरूच ठेवल्याने संतापलेल्या आरोपी भागवत चव्हाण याने तिला लाथाबुक्क्यांनी पोटात, पाठीवर, डोळ्यावर आणि गालावर बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, आरोपीने पीडितेचा ‘रेडमी नार्झो एन ५३’ कंपनीचा मोबाईल फोन आणि तिची महत्त्वाची शैक्षणिक कागदपत्रे हिसकावून घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.

या घटनेनंतर पीडितेने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध  गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय देवराम पाटील हे करत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add