Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेसाठी आ. राजूमामा भोळे सरसावले; जळगावात विशेष बैठक संपन्न

जळगाव

मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेसाठी आ. राजूमामा भोळे सरसावले; जळगावात विशेष बैठक संपन्न

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMay 2, 2026Updated:May 2, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​जळगाव प्रतिनिधी | भारतीय लोकशाहीचा पाया असलेल्या मतदार यादीच्या अचूकतेसाठी आणि बळकटीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या SIR (मतदान पुनरीक्षण यादी कार्यक्रम) संदर्भात जळगाव शहरात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक जळगाव शहराचे आमदार आदरणीय आमदार राजूमामा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली १ मे रोजी पार पडली.

​या बैठकीचा मुख्य उद्देश मतदार याद्यांमधील नावांची पडताळणी करणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे आणि यादीतील दुबार किंवा मृत मतदारांची नावे वगळून यादी दोषमुक्त करणे हा होता. याप्रसंगी बोलताना आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले की, “प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे हे आपले कर्तव्य आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून, सर्व कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन नागरिकांना मार्गदर्शन करावे.”

​या बैठकीला भाजप जळगाव महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, SIR चे मुख्य संयोजक राहुल वाघ आणि जिल्हा समन्वयक राजेश पाटील यांनी उपस्थितांना तांत्रिक बाबींची माहिती दिली. यावेळी मनपा स्थायी समिती सभापती चंद्रशेखर पाटील, नगरसेवक माधुरी बारी, जयश्री पाटील, सुरेश सोनवणे आणि जाकीर पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

​तसेच, मंडल क्र. ५ चे अध्यक्ष अतुल बारी, महानगर महिला उपाध्यक्ष सौ. भाग्यश्री चौधरी, चिटणीस छाया सारस्वत, महानगर उपाध्यक्ष सागर पाटील, चिटणीस राहुल पाटील, सरचिटणीस उमेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष योगेश कोळी आणि योगेश गोसावी यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​या मोहिमेद्वारे जळगाव शहरातील मतदार नोंदणीची प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक करण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026

पुण्यात लपून बसलेला जळगावचा फरार आरोपी जेरबंद; जळगाव एलसीबीची मोठी कारवाई

May 19, 2026

जळगाव मनपामध्ये दर बुधवारी ‘नो-व्हेईकल डे’ पाळणार ! : महापौर

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add