Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»एमआयडीसी हादरली! चटई कंपनीला भीषण आग, सिलिंडरच्या स्फोटांमुळे परिसरात खळबळ

क्राईम

एमआयडीसी हादरली! चटई कंपनीला भीषण आग, सिलिंडरच्या स्फोटांमुळे परिसरात खळबळ

Editorial DeskBy Editorial DeskMay 2, 2026Updated:May 2, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | जळगाव येथील एमआयडीसी परिसरातील ‘जे’ सेक्टरमध्ये असलेल्या एका चटई कारखान्याला आज भीषण आग लागली. ही आग इतकी भयानक होती की, काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले असून संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच कंपनीत असलेल्या गॅस सिलिंडरचे एकामागून एक असे चार भीषण स्फोट झाले, ज्यामुळे परिसरातील नागरिक आणि कामगारांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.

चटई कारखान्यात लागलेली ही आग वाऱ्याच्या वेगाने शेजारील ठिबक सिंचन तयार करणाऱ्या कंपनीपर्यंत पोहोचली. आगीच्या ज्वाळांनी या कंपनीलाही आपल्या विळख्यात घेण्यास सुरुवात केल्याने मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ठिबक कंपनीतील कामगारांनी प्रसंगावधान राखत आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून कंपनीतील प्लास्टिक बंडल व इतर साहित्य सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी मोठी धडपड केली.
​
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते; मात्र पाण्याचा साठा संपल्याने आग पुन्हा भडकली. अग्निशमन दलाची साधनसामग्री अपुरी पडत असल्याचे चित्र दिसून आले. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे जे सेक्टरमधील इतर उद्योगांनाही मोठा धोका निर्माण झाला आहे.
​

या भीषण आगीत चटई कंपनीतील कच्चा माल आणि यंत्रसामग्री जळून खाक झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की अन्य काही कारणाने, याचा तपास पोलीस आणि प्रशासन करत आहेत. सद्यस्थितीत आग पूर्णपणे नियंत्रणात आलेली नसून अग्निशमन दलाचे अधिक बंब पाचारण करण्यात आले आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026

यावलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; महर्षी व्यास मंदिरात हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add