Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»सोशल मीडियातून वाढली ओळख; अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

क्राईम

सोशल मीडियातून वाढली ओळख; अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

Editorial DeskBy Editorial DeskMay 14, 2026Updated:May 14, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

भडगाव प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली आहे. सोशल मीडियातून ओळख झाल्यानंतर आरोपीने मुलीचा विश्वास जिंकत तिचा गैरफायदा घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सिमा परदेशी हीची आणि पिडीत मुलीची ओळख होती. संशयित आरोपी सिमा हीने तेजस मधुकर मराठे यांच्याशी पिडीत मुलीशी ओळख करून दिली. सुरुवातीला मैत्रीपूर्ण संवादातून संशयित आरोपी तेजस याने मुलीला विश्वासात घेतले. त्यानंतर भेटीगाठी वाढवत तिला मानसिक दबावाखाली ठेवण्यात आले. अखेर मुलीवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघड झाला.

घटनेनंतर मुलगी मानसिक धक्क्यात गेली होती. कुटुंबीयांनी विचारपूस केल्यानंतर तिने संपूर्ण प्रकार सांगितला. यानंतर भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ हालचाली करत महिलेसह संशयित आरोपी तेजस परदेशी याला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.बी. एकशिंगे हे करीत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026

यावलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; महर्षी व्यास मंदिरात हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित

July 28, 2026

‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात रंगणार भक्तीचा स्वरसोहळा

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add