Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत मजुराचा मृत्यू !

क्राईम

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत मजुराचा मृत्यू !

Editorial DeskBy Editorial DeskMay 14, 2026Updated:May 14, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव तालुक्यातील पिंप्राळा रस्त्यावर ही दुर्घटना घडली. महेंद्र रामचंद्र कोळी (रा. रायकवाड, ता. चोपडा, जि. जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते मजुरीचे काम करत होते. रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या कचरा वाहतूक ट्रॅक्टरने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत ते गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलविले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. अपघातानंतर चालकाने वाहनावरील नियंत्रण गमावल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून ट्रॅक्टर चालकाविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add