Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»धरणगाव पोलिसांची मोठी कारवाई; गावठी पिस्तूलसह तरुण जेरबंद

क्राईम

धरणगाव पोलिसांची मोठी कारवाई; गावठी पिस्तूलसह तरुण जेरबंद

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMay 15, 2026Updated:May 15, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

धरणगाव प्रतिनिधी | बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध धरणगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, गिरणा नदीच्या पात्रातून एका संशयिताला गावठी बनावटीच्या पिस्तूलसह रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी १४ मे रोजी सायंकाळी ४:३० वाजेच्या सुमारास धरणगाव शिवारातील गिरणा नदीच्या पात्रात एक व्यक्ती संशयास्पदरीत्या वावरत असल्याची गोपनीय माहिती धरणगाव पोलिसांना प्राप्त झाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी विलंब न करता पथक तयार करून संबंधित परिसरात सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयिताला पथकाने शिताफीने ताब्यात घेतले.

​आरोपीची कसून झडती घेतली असता, त्याच्याकडे २५ हजार रुपये किमतीचे एक लोखंडी सिल्व्हर रंगाचे गावठी बनावटीचे पिस्तूल मिळून आले. पोलिसांनी आरोपी आनंदा बळीराम सपकाळे (वय ३९, रा. सिद्धार्थ नगर, आव्हाणे, ता. जळगाव) याला अधिक विचारपूस केली असता, सदर शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना त्याच्याकडे नसल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी तातडीने मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली.

​या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर नथ्थू सपकाळे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026

पुण्यात लपून बसलेला जळगावचा फरार आरोपी जेरबंद; जळगाव एलसीबीची मोठी कारवाई

May 19, 2026

जळगाव मनपामध्ये दर बुधवारी ‘नो-व्हेईकल डे’ पाळणार ! : महापौर

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add