Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण

क्राईम

धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण

Editorial DeskBy Editorial DeskMay 15, 2026Updated:May 15, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

​मुक्ताईनगर प्रतिनिधी | ​मुक्ताईनगर शहरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या भावाने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, संशयित आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, २० वर्षीय तरुण हे आपल्या कुटुंबासह मुक्ताईनगर येथे वास्तव्यास आहेत. १० मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घरातील इतर सदस्य लग्नासाठी गेले असताना तरुण हे घरीच होते. काही वेळानंतर त्यांच्या मोठ्या बहिणीने फोन करून माहिती दिली की, त्यांची धाकटी बहीण (वय १७ वर्षे) हिला परिसरातीलच राहणारा संशयित पवन मोहन गोसावी याने आपल्या मोटारसायकलवर बसवून कुठेतरी नेले आहे.

​ही माहिती मिळताच तरुणाने आपल्या मित्रांसह नॅगेश्वर मंदिर परिसर, भुसावळ रोड आणि शहरातील इतर भागांत बहिणीचा शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. चौकशीअंती असे समोर आले की, संशयित आरोपी पवन गोसावी याने अल्पवयीन मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून तिच्या पालकांच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेले आहे.

​याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांनी  गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्तरावर केला जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026

यावलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; महर्षी व्यास मंदिरात हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित

July 28, 2026

‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात रंगणार भक्तीचा स्वरसोहळा

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add