Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»जळगाव पोलिसांचा ‘प्रॉक्टिव्ह अप्रोच’; कुंटणखान्यावरील कारवाईत उघडकीस आली बांगलादेशी महिला!

क्राईम

जळगाव पोलिसांचा ‘प्रॉक्टिव्ह अप्रोच’; कुंटणखान्यावरील कारवाईत उघडकीस आली बांगलादेशी महिला!

Editorial DeskBy Editorial DeskMay 24, 2026Updated:May 24, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​जळगाव प्रतिनिधी | जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत केलेल्या एका मोठ्या कारवाईत जळगाव पोलिसांना महत्त्वपूर्ण यश आले आहे. पोलिसांनी दाखवलेल्या ‘प्रॉक्टिव्ह अप्रोच’ (सक्रिय दृष्टिकोन) मुळे कुंटणखान्यातून ताब्यात घेण्यात आलेली एक महिला चक्क बांगलादेशी नागरिक असल्याचे तपासात उघड झाले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुका पोलीस  पोलिसांनी २१ मे रोजी पोलिसांनी निमखेडी रोडवरील ‘ब्रम्हांडनायक अपार्टमेंट’ येथे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर अचानक छापा टाकला. या प्रकरणात मुख्य आरोपी सागर सोनवणे (रा. धरणगाव) आणि सीमा ऊर्फ कविता मोरे (रा. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
​या धडक कारवाई दरम्यान पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका करून त्यांची रवानगी आशादीप संस्थेत केली होती. मात्र, पोलिसांनी या गुन्ह्याचा केवळ वरवर तपास न करता ‘पोलीस अँगल’ने सखोल चौकशी सुरू ठेवली. संशयित महिलेची कसून चौकशी केली असता, सुरुवातीला तिने खरी माहिती देण्यास कमालीची टाळाटाळ केली आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

​परंतु, जळगाव पोलिसांच्या चाणाक्ष पथकाने संशय बळावल्याने तिचा मोबाईल जप्त करून त्याची तांत्रिक तपासणी केली. तसेच तिने सादर केलेल्या आधार कार्डची बायोमेट्रिक प्रणालीद्वारे पडताळणी केली असता, धक्कादायक बाब समोर आली. सदर महिलेचे ते आधार कार्ड पूर्णपणे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांच्या कडक चौकशीपुढे अखेर तिने गुदरमळले आणि आपले खरे नाव जाकिया अबुल काहेर फोकर (वय २८ वर्षे) असून, ती मूळची बांगलादेशातील खुलना येथील रहिवासी असल्याचे कबूल केले. बांगलादेशी महिला जळगावात बनावट कागदपत्रांच्या आधारे कशी आली, यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीची साखळी आहे का, याचा पुढील तपास जळगाव तालुका पोलीस करत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add