अमळनेर प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातील सावखेडा गावाजवळ तापी नदी पात्रात अवैधरित्या साठवून ठेवण्यात आलेल्या डिझेलच्या साठ्यावर महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे धाड टाकली आहे. या धडक कारवाईत सुमारे १ लाख ५५ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, परिसरात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार २७ मे रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास उपविभागीय दंडाधिकारी मयूर शिंगळे, तहसीलदार सुराणा, उपविभागीय पोलीस अधिकारी (चोपडा विभाग), पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, मंडळ अधिकारी कल्याणी पाटील आणि ग्राम महसूल अधिकारी पवन शिंगारे यांच्या संयुक्त पथकाने तापी नदीकाठावरील वाळू डेपो परिसराची अचानक तपासणी केली. ल
या तपासणी दरम्यान पथकाला प्लास्टिकच्या ड्रममध्ये लपवून ठेवलेला डिझेलचा मोठा साठा आढळून आला.पंचांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार, विविध ड्रममधून एकूण १ हजार ४७० लिटर डिझेल जप्त करण्यात आले. यामध्ये १५२० किमतीचे डिझेल जप्त केले आहे
प्राथमिक चौकशीत हा बेकायदेशीर साठा अमळनेर येथील गिरीश तुलशीदास बेलदार यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा साठा पूर्णपणे बेकायदेशीर असल्याने महसूल विभागाने तो जप्त करून पुढील कारवाईसाठी अमळनेर पोलीस ठाण्यात जमा केला आहे.
संशयित आरोपीविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध इंधन साठवणूक आणि काळाबाजार करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.



