Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»​जळगावात ‘हिट अँड रन’चा थरार; १५ वर्षीय अल्पवयीन कारचालकाने ९ जणांना उडवले!

क्राईम

​जळगावात ‘हिट अँड रन’चा थरार; १५ वर्षीय अल्पवयीन कारचालकाने ९ जणांना उडवले!

Editorial DeskBy Editorial DeskJune 4, 2026Updated:June 4, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​जळगाव प्रतिनिधी | शहरातील अत्यंत वर्दळीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामानंदनगर भागातील गिरणा टाकी ते चर्च दरम्यान रात्रीच्या सुमारास एक ‘हिट अँड रन’चा थरारक प्रकार समोर आला आहे. एका अवघ्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने चालवलेल्या भरधाव कारने रस्त्यावरील तब्बल ९ जणांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन दाम्पत्यांसह एक तरुण, असे एकूण पाच जण गंभीर जखमी झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

​प्राथमिक माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन कारचालकाचे कारवरील नियंत्रण अचानक सुटले. नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव वेगाने जाणाऱ्या या कारने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना आणि वाहनांना एकापाठोपाठ एक अशी जोरदार धडक दिली. यामध्ये एका इलेक्ट्रिक दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणालाही कारने उडवले, ज्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या अपघाताचा आवाज आणि जखमींचा आक्रोश ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यामुळे काही काळ या ठिकाणी कमालीचा गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
​अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांच्या भीतीने अल्पवयीन कारचालक आपली कार घटनास्थळीच सोडून अंधाराचा फायदा घेत फरार झाला.

जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
​विशेष म्हणजे, एवढी मोठी आणि गंभीर घटना घडूनही रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत नोंद करण्यात आली नव्हती. मात्र, घटनेची गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी या प्रकरणाची दखद घेतली असून, फरार झालेल्या अल्पवयीन कारचालकाचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे शहरात अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने देणाऱ्या पालकांच्या बेजबाबदारपणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add