Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»भुसावळमध्ये खळबळजनक हत्याकांड; मंदिरातील मुख्य पुजाऱ्याचा अज्ञातांकडून खून

क्राईम

भुसावळमध्ये खळबळजनक हत्याकांड; मंदिरातील मुख्य पुजाऱ्याचा अज्ञातांकडून खून

Editorial DeskBy Editorial DeskJune 29, 2026Updated:June 29, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

भुसावळ प्रतिनिधी |  शहरालगत असलेल्या झेडटीआरआय बोगद्याजवळील मंदिरातील मुख्य पुजाऱ्याची अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी २९ जून सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे भुसावळ शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

संतोष रघुवीर मंचल (वय ५५, रा. झेडटीआरआय परिसर, भुसावळ) असे मृत पुजाऱ्याचे नाव आहे. ते आरपीडी मार्गालगत लष्करी डेपोपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील तीन मंदिरांमध्ये अनेक वर्षांपासून नियमित पूजा-अर्चा करत होते.
सोमवारी सकाळी त्यांच्या कुटुंबीयांनी मंदिरात भेट दिली असता संतोष मंचल यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. त्यांच्या डोक्यावर जड वस्तूने वार करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. ही माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आणि तातडीने भुसावळ शहर पोलिसांना माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, पोलीस निरीक्षक महेश गायकवाड व अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला.

दरम्यान, खून नेमका कोणत्या कारणातून झाला, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. चोरी, वैयक्तिक वैमनस्य किंवा इतर कोणत्या कारणातून हा प्रकार घडला का, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. ठसेतज्ज्ञ व फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add