Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»सीसीटीव्हीत कैद थरार! कुत्र्याच्या हल्ल्याने कासमवाडीत खळबळ

क्राईम

सीसीटीव्हीत कैद थरार! कुत्र्याच्या हल्ल्याने कासमवाडीत खळबळ

Editorial DeskBy Editorial DeskJune 29, 2026Updated:June 29, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी  | शहरातील कासमवाडी परिसरात मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या त्रासामुळे आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साडेतीन वर्षांच्या एका चिमुकल्यावर मोकाट कुत्र्याने अचानक हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यात मोहम्मद मिर्झा हा बालक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चिमुकला परिसरात खेळत असताना अचानक एका मोकाट कुत्र्याने त्याच्यावर झडप घातली. आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिकांनी धाव घेत कुत्र्याला हुसकावून लावले आणि बालकाची सुटका केली. या संपूर्ण घटनेचे दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून ते सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

जखमी बालकाला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन मिळवण्यासाठी नातेवाईकांना हेलपाटे मारावे लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरही नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, कासमवाडीसह शहरातील अनेक भागांत मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने तातडीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.

प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास महापालिका कार्यालय आणि आयुक्तांच्या निवासस्थानी मोकाट कुत्रे सोडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संतप्त नागरिकांनी दिला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add