Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे महापौर यांचे निर्देश

जळगाव

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे महापौर यांचे निर्देश

Editorial DeskBy Editorial DeskOctober 28, 2026Updated:October 28, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | महापौर स्वच्छता संकल्प अभियान अंतर्गत महापौर दीपमाला काळे यांनी वार्ड क्रमांक १० मधील विविध भागांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या पाहणीदरम्यान खंडेराव नगर, मयूर कॉलनी आणि पिंप्राळा येथील गणपती नगर परिसरातील स्वच्छता, सांडपाणी निचरा, पथदिवे आणि इतर नागरी समस्यांचा आढावा घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले.

स्वच्छता आणि दंडात्मक कारवाई : खंडेराव नगर परिसरातील खुले भूखंड त्वरित स्वच्छ करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. तसेच, खुल्या जागेवर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर तात्काळ दंडात्मक कारवाई (दंड आकारणे) करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

हायमास्ट लॅम्प दुरुस्ती : परिसरातील हायमास्ट लॅम्पची तातडीने दुरुस्ती करावी आणि गरज पडल्यास नवीन लॅम्प बसवावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

गटारीचे साचलेले पाणी : मयूर कॉलनी भागातील एका खुल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणावर गटारीचे पाणी साचलेले निदर्शनास आल्यावर महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कर्मचाऱ्यांना या पाण्याचा तात्काळ निचरा करण्याचे आदेश देत, गटारींच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यासाठी बांधकाम विभागाला सांगितले.

पथदिवे व वीज कंपनीचा समन्वय : पिंप्राळा येथील गणपती नगर भागात पथदिवे व्यवस्थित नसून एमएसईबीद्वारे खांबाला केबल पेटी लावण्यात आलेली नाही. यावर महापालिका व वीज कंपनीच्या समन्वयातून हे काम त्वरित पूर्ण करून घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. प्लास्टिक व कचरा हटाव : परिसरातील ओपन स्पेसमध्ये पडलेला कचरा आणि त्यात मोठ्या प्रमाणावर असलेला प्लास्टिकचा कचरा पाहून महापौरांनी तो तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश दिले.

या पाहणी दौऱ्यावेळी वार्ड क्रमांक १० चे नगरसेवक सुरेश सोनवणे, माधुरी अतुल बारी, आरोग्य विभागाचे प्रमुख समीर बोरोले, बांधकाम विभागाचे अभियंता मनोज वन्नेरे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

हिंगणे बुद्रुक भरदिवसा घरफोडी; २ लाख २५ हजारांचा ऐवज लंपास!

October 28, 2026

हेडगेवार नगरातील घरफोडीचा उलगडा; तीन चोरट्यांना अटक

October 28, 2026

पाळधी-तरसोद बायपासवर मृत्यूचे तांडव! आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

October 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add