Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»मनपाच्या बालवाडीला सुविधा पुरवण्यासह, कचरामुक्त वॉर्डसाठी प्रशासनाला कडक निर्देश

क्राईम

मनपाच्या बालवाडीला सुविधा पुरवण्यासह, कचरामुक्त वॉर्डसाठी प्रशासनाला कडक निर्देश

Editorial DeskBy Editorial DeskOctober 30, 2026Updated:October 30, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | ‘महापौर स्वच्छता संकल्प अभियान’ अंतर्गत शुक्रवारी, दिनांक ३० ऑक्टोबर रोजी महापौर दीपमाला काळे यांनी वार्ड क्रमांक १३ मध्ये प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान वॉर्डातील स्वच्छता, रस्ते, गटारी आणि मूलभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेत त्यांनी संबंधित विभागांना तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले.

या पाहणी प्रसंगी स्थानिक नगरसेवक नितीन सपके, वैशाली पाटील, प्रफुल्ल देवकर, सुरेखा तायडे यांच्यासह आरोग्य विभागाचे प्रमुख समीर बोरोले, बांधकाम विभागाचे अभियंता विजय मराठे, पाणीपुरवठा विभागाचे धम्मरत्न बाविस्कर तसेच इतर अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दौऱ्यातील प्रमुख मुद्दे

डी मार्ट रस्ता व मोकळे प्लॉट स्वच्छता :
आरटीओ कार्यालयाच्या पुढील बाजूस डी मार्ट रस्त्यावर सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेचा महापौरांनी आढावा घेतला. तसेच, परिसरातील मोकळ्या प्लॉटमध्ये वाढलेले तण आणि अस्वच्छता तातडीने जेसीबीच्या सहाय्याने साफ करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

नागरिकांच्या मागण्यांना प्राधान्य :
गणपती मंदिराजवळ नागरिकांच्या मागणीनुसार नवीन पथदिवे आणि गतिरोधक बसवण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या.
विविध भागांचा आढावा व तात्काळ सफाई :
आदर्श नगर, रवींद्र नगर, मोहन नगर आणि नूतन वर्षा कॉलनी परिसर या भागांमध्ये पाहणी करून रस्त्यांवर व गटारींमध्ये साचलेल्या कचऱ्याची पाहणी करण्यात आली. हा कचरा तत्काळ उचलून परिसर स्वच्छ करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले.

रवींद्र नगर बालवाडीचा विकास :
रवींद्र नगर येथील महानगरपालिकेच्या बालवाडीच्या पुढील व मागील बाजूस पूर्णपणे वाढलेली झाडेझुडपे काढून स्वच्छता करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले. तसेच, अतिशय सुंदर असलेल्या या बालवाडीमध्ये  पाण्याची सुविधा पुरवणे, मुलांसाठी प्रसाधनगृह बांधणे आणि परिसरात पेव्हर ब्लॉक बसवणे याबाबत आढावा घेऊन उभारण्याबाबत सूचना बांधकाम विभागाला दिल्या.

नवीन वाहनांचा प्रभावी वापर :
वॉर्डात साफसफाईसाठी  उपलब्ध झालेल्या वाहनांचा जास्तीत जास्त वापर करून गटारी, मोकळे प्लॉट आणि रस्त्यांवरील कचरा नियमित उचलला जावा, जेणेकरून वॉर्ड पूर्णपणे स्वच्छ व सुंदर होईल, असे आवाहन महापौरांनी केले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

भोकरच्या SBI बँकेवर दरोडा! चादर विक्रीच्या बहाण्याने रेकी, पोलिसांचा पाठलाग अन् चावलखेड्यातून तीन संशयित जेरबंद!

October 31, 2026

किनगाव घटनेवरून काँग्रेस आक्रमक; लाठीचार्ज पोलिसांनीच केल्याचा जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी यांचा गंभीर आरोप!

October 31, 2026

अवैध वाळू वाहतुक करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

October 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add