Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»जिल्हा बँक निवडणुकीसाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जळगाव

जिल्हा बँक निवडणुकीसाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Editorial DeskBy Editorial DeskOctober 30, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

चाळीसगाव प्रतिनिधी | दगडी बँक म्हणून नावलौकिक असलेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आज चाळीसगाव सोसायटी गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

यावेळी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष रोहित निकम, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, जळगाव महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, दूध संघाचे संचालक मधुकर राणे यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. आगामी जिल्हा बँक निवडणुकीसाठी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या महायुती पॅनलबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भातील अंतिम निर्णय राज्याचे जलसंपदामंत्री ना. गिरीशभाऊ महाजन आणि पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आता कोणती राजकीय समीकरणे आकाराला येतात आणि महायुतीच्या पॅनलबाबत काय निर्णय होतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

भोकरच्या SBI बँकेवर दरोडा! चादर विक्रीच्या बहाण्याने रेकी, पोलिसांचा पाठलाग अन् चावलखेड्यातून तीन संशयित जेरबंद!

October 31, 2026

किनगाव घटनेवरून काँग्रेस आक्रमक; लाठीचार्ज पोलिसांनीच केल्याचा जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी यांचा गंभीर आरोप!

October 31, 2026

अवैध वाळू वाहतुक करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

October 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add