Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»भडगावात पोलीस लाईन परिसरातून अज्ञात चोरट्याने लांबविला डंपर

क्राईम

भडगावात पोलीस लाईन परिसरातून अज्ञात चोरट्याने लांबविला डंपर

Editorial DeskBy Editorial DeskNovember 1, 2026Updated:November 1, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

भडगाव प्रतिनिधी | भडगाव शहरातील पोलीस लाईन परिसरातून तब्बल २० लाख रुपये किमतीचा डंपर चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्याने संधी साधत डंपर लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रसिद्धीर किटकुळे सोनवणे (वय ५१, व्यवसाय नोकरी, रा. भडगाव) यांच्या मालकीचा टाटा सिग्मा कंपनीचा डंपर पोलीस लाईन, भडगाव येथून चोरीला गेला आहे. या डंपरची किंमत अंदाजे २० लाख रुपये असून, त्याला नंबर प्लेट नसल्याची नोंद पोलिसांच्या गुन्हे नोंदवहीत करण्यात आली आहे. डंपरवर ‘न्यू पार्सिंग टायगर नायल व आई’ असे नाव लिहिलेले असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

३० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजेच्या दरम्यान हा डंपर चोरीला गेल्याचे समोर आले आहे. अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय डंपर चोरून नेल्याने भडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस कॉन्स्टेबल विजय जाधव करीत आहेत. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप आरोपी अज्ञात असून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

कारागृहात कट, बँकेत दरोडा! भोकर प्रकरणाचा मास्टरमाइंड बडतर्फ PSI असल्याची माहिती; चौघे अटकेत!

November 1, 2026

भोकरच्या SBI बँकेवर दरोडा! चादर विक्रीच्या बहाण्याने रेकी, पोलिसांचा पाठलाग अन् चावलखेड्यातून तीन संशयित जेरबंद!

October 31, 2026

किनगाव घटनेवरून काँग्रेस आक्रमक; लाठीचार्ज पोलिसांनीच केल्याचा जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी यांचा गंभीर आरोप!

October 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add