Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षनेतेपदी सुनेत्रा पवार यांनी निवड निश्चित;

ताज्या बातम्या

राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षनेतेपदी सुनेत्रा पवार यांनी निवड निश्चित;

Editorial DeskBy Editorial DeskJanuary 30, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

साधेपणाने पार पडणार शपथविधी सोहळा

मुंबई विशेष प्रतिनिधी : अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड उद्या, शनिवारी करण्यात येणार आहे. पक्षाच्या या निर्णयामुळे सुनेत्रा पवार या राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारतील, हे आता स्पष्ट झाले असून उद्याच त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याचे समजते.

​नेतेपदी निवडीसाठी आमदारांची बैठक
​राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची विशेष बैठक उद्या शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची पक्षनेतेपदी एकमताने निवड केली जाईल. त्यानंतर राष्ट्रवादीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे अधिकृत निवडीचे पत्र सोपवले जाईल. लगेचच सुनेत्रा पवार यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करून त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे.

​मुख्यमंत्र्यांशी प्रमुखांची चर्चा
​आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी पक्षाच्या या निर्णयाची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. उपमुख्यमंत्रीपदाचा हा शपथविधी सोहळा राजभवनावर अत्यंत साधेपणाने पार पडणार आहे.

​राज्यपालांच्या वेळेनुसार होणार शपथविधी
​सुनेत्रा पवार यांची निवड झाल्यानंतर लगेचच शपथविधी उरकण्याचा पक्षाचा मानस आहे. मात्र, हा सोहळा नेमका किती वाजता होईल, हे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या नियोजित कार्यक्रमावर अवलंबून असेल. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा आता सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवून पक्षाने आपली पुढील राजकीय दिशा स्पष्ट केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add