Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»जळगाव शहरातील श्री ओंकारेश्वर मंदिराचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात ;

जळगाव

जळगाव शहरातील श्री ओंकारेश्वर मंदिराचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात ;

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraJanuary 31, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील श्रद्धेचे प्रमुख केंद्र असलेल्या श्री ओंकारेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री ओंकारेश्वर मंदिराचा ५५ वा वर्धापन दिन सोहळा आज ३१ जानेवारी रोजी अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. सुवर्णमहोत्सवाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त पहाटेपासूनच विविध धार्मिक विधी आणि पूजन कार्यक्रमांना सुरुवात झाली असून, मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

वर्धापन दिनाचे औचित्य साधून जोशी परिवाराच्या हस्ते मंदिरात विधीवत धार्मिक अनुष्ठाने पार पडली. यामध्ये पुण्याहवाचन, घंटापूजन, दीपक पूजन व शंखपूजन करण्यात आले. यासोबतच गणेश-अंबिका पूजन, द्वारपूजन व वास्तुपूजन करून मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकवण्यात आला. या धार्मिक विधींमुळे संपूर्ण मंदिर परिसरात अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.

भगवान शंकराच्या पिंडीसह मूर्तीला भक्तिभावाने दुग्धाभिषेक करण्यात आला. विशेष म्हणजे, या अभिषेकासाठी नर्मदा नदीचे पवित्र जल व गंगाजलाचा वापर करण्यात आला. वेद मंत्रोच्चारांच्या घोषात सुरू असलेल्या या अभिषेक सोहळ्याने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या असून, शिवभक्तांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे.

वर्धापन दिनानिमित्त सकाळच्या धार्मिक विधींसोबतच दिवसभर विविध आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांच्या दर्शनाची व सोयीची योग्य व्यवस्था श्री ओंकारेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टतर्फे करण्यात आली आहे. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली असून, संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे.

या वर्धापन दिन सोहळ्याची सांगता सायंकाळी भव्य महाआरतीने होणार आहे. सायंकाळी ठीक ६.३० वाजता श्री ओंकारेश्वराची महाआरती संपन्न होणार असून, या मंगलप्रसंगी जळगाव शहरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व महाआरतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जोशी परिवारातर्फे करण्यात आले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add