Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»मुंजोबा यात्रेत पाच महिलांच्या सोनसाखळ्या लंपास

जळगाव

मुंजोबा यात्रेत पाच महिलांच्या सोनसाखळ्या लंपास

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 2, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

अत्रावल परिसरात भरलेल्या मुंजोबा यात्रेत गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने पाच महिलांच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्र आणि पोत लंपास केल्याची घटना घडली

यावल प्रतिनिधी – यावल येथील अत्रावल परिसरात भरलेल्या मुंजोबा यात्रेत गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने पाच महिलांच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्र आणि पोत लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना ३१ जानेवारी रोजी दुपारी १ ते ४ वाजेच्या दरम्यान घडली असून, याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, फिर्यादी मंदाकिनी मुकेश गजरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर चार महिला यात्रेसाठी गेल्या होत्या. गर्दीच्या ठिकाणी अज्ञात आरोपीने या पाचही महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अत्यंत शिताफीने चोरले. यामध्ये मंदाकिनी गजरे, राखी सुरवाडे, रुपाली कोळी, रोहिणी जाधव आणि स्वाती वराडे यांच्या मंगळसूत्रांचा समावेश आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण ५६ हजार रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ नरेंद्र बागुले या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अद्याप कोणत्याही आरोपीला अटक झालेली नाही.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add