Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»माहितीचा अधिकार मागे घेण्यासाठी एकाला बेदम मारहाण ; गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

माहितीचा अधिकार मागे घेण्यासाठी एकाला बेदम मारहाण ; गुन्हा दाखल

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 2, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

माहितीचा अधिकार (RTI) अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून एका शेतकऱ्याला नऊ जणांनी मिळून बेदम मारहाण

पाचोरा प्रतिनिधी – पाचोरा तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे माहितीचा अधिकार (RTI) अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून एका शेतकऱ्याला नऊ जणांनी मिळून बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भागवत बंडू पाटील (वय ४५) असे जखमी फिर्यादीचे नाव असून, त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, ३१ जानेवारी रोजी सकाळी ८:३० वाजता गावातील ग्रामपंचायत कार्यालयाजवळील मंदिराजवळ घडली. फिर्यादी पाटील मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर येत असताना, आरोपी अमोल बाविस्कर आणि त्याच्या इतर आठ साथीदारांनी त्यांना अडवले. “तू माहितीचा अधिकार मागे घे, आमचे ऐकले नाही तर परिणामांना सामोरे जावे लागेल,” अशी धमकी देत आरोपींनी त्यांना शिवीगाळ सुरू केली.या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी पाटील यांना चापटबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात अमोल बाविस्कर, दादाराव बाविस्कर, रमेश बाविस्कर यांच्यासह एकूण नऊ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक फौजदार हिरालाल पाटील तपास करत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add