
भुसावळ येथील संतोष माता हॉल वर केलेली कारवाई नियम बाह्य व अनपेक्षित
– संस्थेचे व्हा चेअरमन वरूण इंगळे यांचे प्रतिपादन
भुसावळ प्रतिनिधी : येथील संतोषी माता हॉल बांधण्यास कायदेशीर मान्यता नगरपालिकेने आम्हाला दिली होती . आम्ही त्याचा दर वर्षाला नगरपालिकेस लाखो रुपये टॅक्स भरत आहे . तेवीस वर्षा पासून ही इमारत उभी आहे . सदरची ही कारवाई करताना आम्हाला शंका वाटत असून आम्ही याबाबत न्यायालयात गेलो असून न्यायालयात आमचा खटला प्रलंबीत असून अधिकाऱ्यांकडून कारवाई होणे अपेक्षित नव्हते .
यापूर्वी आम्हाला तीन वर्षाचा ठराव तसेच तीस वर्षाचा ठराव करून देण्यात आलेला होता तरीसुद्धा आमच्यावर कारवाई होणे हे अनपेक्षित आहे आम्ही याबद्दल लवकरच पत्रकार परिषद घेऊन कागदपत्र आपणाकडे सादर करणार अशी माहिती संतोषीमाता संस्थेचे व्हाईस चेअरमन वरून इंगळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे असुन यात राजकीय हस्तक्षेप असल्याचे सांगितले .


