
स्पेनमध्ये होणार्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली रवाना
यावल : यावल तालुक्यातील किनगाव येथील रहिवासी दिशा विजय पाटील या बॉक्सर गर्लची भारतीय बॉक्सिंग संघात निवड झाली आहे. स्पेन येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ती रवाना देखील झाली. 57 ते 60 किलो वजन गटात ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्या या निवडीबद्दल व स्पेनमध्ये ती भारताचे करत असलेल्या प्रतिनिधित्व बद्दल तिला शुभेच्छा दिल्या जात आहे.
किनगाव, ता.यावल येथील रहिवाशी तथा महाराष्ट्र बॉक्सर संघाची खेळाडू दिशा विजय पाटील हिची नुकतेच भारतीय बॉक्सिंग संघात निवड झाली आहे. पटियाला येथे तिचा गेल्या काही दिवसांपासुन सराव कॅम्पमध्ये सराव सुरू होता. पटियाला येथे सराव पार पडल्यानंतर ती स्पेन मध्ये होणार्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी स्पेन येथे रवाना झाली आहे. दिशा पाटील हिने देशांतर्गत खेळल्या गेलेल्या खेलो इंडिया मध्ये सुवर्णपदक पटकावले होते. त्याचप्रमाणे तिने विविध स्पर्धा गाजवल्या व आता ती भारतीय संघात 57 ते 60 किलो वजन गटात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या त्याच्या या निवडीबद्दल तिचे यावल तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे. व तिला स्पेन मधील स्पर्धेसाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहे. दिशा पाटील ही संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय पाटील किनगावकर यांची कन्या आहे.
न्युसिया येथे बॉक्सम टूर्नामेंट
स्पेनमधील न्यसिया येथे जागतीक स्तरावरील बॉक्सम टूर्नामेंट होते. यात संपूर्ण जगातील बॉक्सर येतात. जगभरातील देश यात सहभाग घेतात. विविध वजन गटात ही स्पर्धा रंगते या स्पर्धेकडे जगाचे लक्ष असते. ही स्पर्धा 2 फेब्रुवारी 2026 पासुन सुरू होत आहे.दिशा पाटील या करीता शनिवारी स्पेनला रवाना झाली.


